Yoga Poses : ‘ही’ योगासने तुम्हाला ठेवतील बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून दूर

| Updated on: Jan 10, 2022 | 12:37 PM

योगासने हे अनेक आजारांवर उपयोगी ठरतात. तुम्ही जर नियमीतपणे योगासने करत असाल तर तुम्ही दिर्घकाळ निरोगी आयुष्य जगू शकता. आज आपण अशाच काही योगासनांबद्दल जाणून घेणार आहोत, जे तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून दूर ठेवण्यास मदत करतील.

1 / 4
पवनमुक्तासन - पाठीवर झोपा. आपले गुडघे वाकवा आणि आपल्या मांड्या पोटापर्यंत आणा, आपले गुडघे आणि घोटे एकत्र ठेवा. आपले हात पायभोवती आणा आणि त्यांना एकत्र करा. तुमची मान वर करा आणि तुमची हनुवटी तुमच्या छातीवर आणा. 4-5 सेकंद या स्थितीत रहा आणि नंतर तुमच्या पूर्वीच्या स्थितीमध्ये या.

2 / 4
मलासना - चटईवर पाय पसरून उभे राहा. त्यानंतर आपले गुडघे हळूहळू खाली वाकवा. छायाचित्रात दाखवल्याप्रमाणे आपली कंबर आणि तळवे समांतर राहातील याची काळजी घ्या. हे आसन करताना तुमच्या पाठीचा कणा आणि मान सरळ ठेवा. परत तुमच्या पूर्वीच्या स्थितीमध्ये या.

3 / 4
बालासन - हे आसन करताना सर्वप्रथम तुम्ही योगा चटईवर गुडघे टेकून, दोनही पायाच्या मदतीने तुमचे शरीरी पुढच्या बाजूला झुकवा, त्यानंतर दोन्ही हात सरळ एका दिशेत पुढे करा. हे आसन करताना तुमच्या पायाचे तळवे हे वर आसावेत तसेच गुडघ्यांमध्ये  थोडे अंतर राहील याची काळजी घ्या. हे आसन करताना डोक्याने चटईला स्पर्श करा. चार ते पाच सेंकद श्वास घ्या आणि नंतर सोडा. पुन्हा आपल्या पूर्वीच्या स्थितीमध्ये या.

4 / 4
भुजंगासन - हे आसन करताना तुम्ही जमिनीवर पोटाच्या मदतीने झोपा. त्यानंतर छायाचित्रात दाखवल्याप्रमाणे दोन्ही हातावर दाब देत डोके वर करा. हे करत असताना तुमच्या पायाचे तळवे जमिनीवरच राहातील यांची काळजी घ्या.  त्यानंतर हळूहळू कपाळ वर घ्या, आणि वर पहा. त्यानंतर एक दीर्घ श्वास घेत हळूहळू आपले हात वर करा. हे आसन करत असताना हाताची कोपरे सरळ राहातील यांची काळजी घ्या. याच स्थितीमध्ये तुम्ही तुमची छाती वर घ्या. काही काळ याच स्थितीमध्ये राहा. त्यानंतर पुन्हा तुमच्या पूर्वीच्या स्थितीमध्ये या.