
'जीव माझा गुंतला' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे योगिता चव्हाण. योगिताने 2024मध्ये अभिनेता सौरभ चौघुलेशी लग्न केले होते. पण आता त्यांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याचे बोलले जात आहे.

योगिता चव्हाणने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन लग्नाचे फोटो डिलिट केले आहेत. तसेच तिने सौरभला अनफॉलो केले आहेत. त्यामुळे ते विभक्त होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणाऱ्या योगिताने गेल्या काही महिन्यांपासून सौरभसोबतचे फोटो आणि रिल्स शेअर केलेले नाहीत. तसेच दिवाळी साजरी करताना देखील फोटो शेअर केलेले नाहीत.

योगिताच्या सोशल मीडिया अकाऊंटवर केवळ त्यांचे ग्रूप फोटो, जुने रिल्स आणि मुलाखती पहायला मिळत आहेत. त्यामुळे घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, योगिता आणि सौरभ हे गेल्या काही महिन्यांपासून वेगळे राहत आहेत. मात्र, दोघांनीही याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.