
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नुकतंच सुट्टयांचा आनंद घेऊन मालदीवमधून मुंबईत परतली आहे. मालदीवमध्ये जान्हवीनं तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत खूप धमाल केली आहे.

मुंईत परत आल्यानंतरही जान्हवी आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. या फोटोंमध्ये तिचा अतिशय हॉट अवतार दिसला आहे.

त्याचबरोबर तिने सोशल मीडियावर काही बिकीनीमधील फोटो शेअर केली आहेत. या फोटोंमध्ये ती प्रचंड हॉट दिसत आहे.

अभिनेत्रीचे हे फोटो पाहून नेटकरी सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. काही लोक तिचं कौतुक करत आहेत. त्याचबरोबर काही यूजर्स तिला ट्रोल करत आहेत. ज्यामुळे तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

जाह्नवीच्या या फोटोवर कमेंट करताना एका यूजरनं लिहिलं की, "तू श्रीदेवीचं नाव खराब करत आहे", तर एका यूजरनं लिहिले की "तुझ्यापेक्षा चांगली बॉडी माझी आहे". आतापर्यंत जान्हवीच्या या फोटोला 51 हजार लोकांनी लाईक केलं आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर जान्हवी नुकतंच राजकुमार राव आणि वरुण शर्मासोबत ‘रुही’ या चित्रपटात झळकली. आता जान्हवी कपूर 'गुड लक जेरी', 'तख्त' आणि 'दोस्ताना 2' यासारख्या बड्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

जान्हवीच्या आधीच्या चित्रपटानं बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. ज्यानंतर आता तिच्याकडून प्रेक्षकांची अपेक्षा वाढली आहे.