
'आशिकी 2' नंतर मोहित सूरी 'सैयारा' नावाची नवीन लव्ह स्टोरी घेऊन प्रेक्षकांमध्ये आले आहेत. या दोन चित्रपटांदरम्यान डायरेक्टरने अजूनही काही चित्रपट बनवलेत. 'सैयारा' ची 'आशिकी 2' बरोबर तुलना केली जातेय. या चित्रपटाला आशिकी 3 सुद्धा म्हटलं जातय.

'सैयारा' 18 जुलैला थिएटर्समध्ये रिलीज झाला. बऱ्याच प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला आहे. रिलीजनंतर चित्रपटाने भरपूर कमाई सुद्धा केली. चित्रपटात दोन नवीन चेहरे सुद्धा आहेत. अनीत पड्डा आणि अहान पांडे. या चित्रपटाद्वारे अहानने डेब्यु केलाय.

अहान पांडे चिक्की पांडेचा मुलगा आहे. चिक्की पांडे चंकी पांडेचा भाऊ आहे. अहानच्या डेब्यूवरुन बरेच प्रश्न उपस्थित केले जात होते. अहानने 'सैयारा'मध्ये कमालीचा डेब्यु केलाय. लीड एक्टर म्हणून त्याचा अभिनय बघून बरेच लोक भरभरुन कौतुक करतायत.

मोहित सूरीने अहानला कसं कास्ट केलं? त्या बद्दल खुलासा केलाय. मोहितने सांगितलं की, अहानच नाव फिल्ममेकर आदित्य चोप्राने सुचवलेलं. 'सैयारा' ची स्क्रिप्ट वाचल्यानंतर आदित्य म्हणाला की, या रोलसाठी माझ्याकडे एक व्यक्ती आहे.

इंडिया टुडेशी बोलताना मोहित सुरीने खुलासा केला की, अहान 'सैयारा' च्या आधी यशराज फिल्म्ससोबत प्रोजेक्ट करणार होता. काही कारणांमुळे ते प्रोजेक्ट होऊ शकला नाही. त्यानंतर आदित्यने 'सैयारा' साठी अहानच नाव सुचवलं.