लग्नासाठी तयार आहे फक्त..; धनश्रीसोबत घटस्फोटानंतर युजवेंद्र चहलचा मोठा निर्णय

कोरिओग्राफर- डान्सर धनश्री वर्माचा पूर्व पती आणि क्रिकेटर युजवेंद्र चहल पुन्हा एकदा संसार थाटण्यासाठी सज्ज आहे. याचा खुलासा खुद्द चहलने सोशल मीडियावर केला आहे. यावर आता चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत.

Updated on: Nov 26, 2025 | 8:20 PM
1 / 5
क्रिकेटपटू युजवेंद्र चहल सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून इन्स्टाग्रामवर त्याने नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहे. या फोटोंमध्ये युजवेंद्रचा डॅशिंग अंदाज पहायला मिळतोय. परंतु फोटोंपेक्षाही अधिक चहलच्या कॅप्शनची जोरदार चर्चा आहे. या कॅप्शनमध्ये चहलने दुसऱ्या लग्नाविषयी लिहिलं आहे.

2 / 5
युजवेंद्र चहलने 22 डिसेंबर 2020 रोजी कोरिओग्राफर आणि डान्सर धनश्री वर्माशी लग्न केलं होतं. परंतु लग्नाच्या पाच वर्षांतच त्यांनी घटस्फोट घेतला. आता घटस्फोटानंतर चहल दुसऱ्यांदा संसार थाटण्यासाठी सज्ज आहे. याबद्दल खुद्द चहलनेच सांगितलं आहे.

3 / 5
इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत चहलने कॅप्शनमध्ये लिहिलं, 'लग्नासाठी तयार आहे, फक्त एक मुलगी पाहिजे.' यासोबतच त्याने हसण्याचा इमोजी पोस्ट केला आहे. चहलच्या या पोस्टवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.

4 / 5
धनश्रीला घटस्फोट दिल्यानंतर युजवेंद्र चहलचं नाव आरजे महवश हिच्याशी जोडलं गेलं. अनेकदा चहल आणि महवश यांना एकत्रही पाहिलं गेलंय. परंतु दोघांनी त्यावर थेट प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे चहलच्या या पोस्टच्या कमेंटमध्ये काही नेटकऱ्यांनी महवशलाही टॅग केलं आहे.

5 / 5
युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर-इन्फ्लुएन्सर धनश्री वर्मा हे या वर्षी विभक्त झाले. कोर्टातील सुनावणीदरम्यान धनश्री आणि युजवेंद्रने स्पष्ट केलं होतं की ते गेल्या 18 महिन्यांपासून वेगळे राहत होते.