लालबाग-परळच्या कुटुंबाची स्टोरी TV वर हिट! तुम्ही पाहाताय का ही मालिका? सध्या आहे चर्चेत

सध्या एक मालिका सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या मालिकेत लालबाग-परळमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे. आता ही मालिका कोणती चला जाणून घेऊया...

| Updated on: Apr 06, 2026 | 12:43 PM
1 / 6
छोट्या पडद्यावर नेहमीच वेगवेगळ्या मालिका येत असतात. काही मालिका अल्पवधीतच प्रेक्षकांच्या मनात घर करतात. अशीच एक मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेत मुंबईतील लालबाग-परळ येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे. आता ही मालिका कोणती? चला जाणून घेऊया...

छोट्या पडद्यावर नेहमीच वेगवेगळ्या मालिका येत असतात. काही मालिका अल्पवधीतच प्रेक्षकांच्या मनात घर करतात. अशीच एक मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेत मुंबईतील लालबाग-परळ येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे. आता ही मालिका कोणती? चला जाणून घेऊया...

2 / 6

लालबाग-परळच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबावर आधारित झी मराठीची नवी मालिका 'सनई चौघडे'ने प्रेक्षकांच्या मनात लगेचच घर केलं आहे. वास्तववादी कथा, मराठी बोलीभाषेची मस्ती आणि भावनिक नात्यांची गुंफण यामुळे ही मालिका अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झाली.

3 / 6

विशेष म्हणजे, सुरुवातीच्या पहिल्याच आठवड्यात 'सनई चौघडे'ने TRP यादीत टॉप 10 मध्ये स्थान मिळवलं. कलाकारांचा दमदार अभिनय, कथानकातील रोचक ट्विस्ट आणि भावनिक गुंतवणूक यामुळे प्रेक्षक मालिकेशी एकरूप होत आहेत.

4 / 6

लालबाग-परळच्या या साध्या-सरळ कुटुंबीयांच्या कहाणीने लोकांच्या मनाला भिडलं आहे. त्यामुळे मालिका सुरू होताच तिने TRP चार्टमध्ये टॉप 10 मध्ये एंट्री मारली.

5 / 6

आता दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला प्रेक्षकांसाठी एक खास सरप्राईज तयार आहे. बहुप्रतिभावान अभिनेता चिन्मय मांडलेकर 'सनई चौघडे'मध्ये दमदार कमबॅक करत आहेत. ते मालिकेत सत्यजीत या भूमिकेत दिसणार आहेत.

6 / 6

सध्या कथानकात शर्वरी नोकरीसाठी मुलाखत देताना दिसत आहे. योगायोगाने ती ज्या कंपनीत इंटरव्ह्यू देते, ती कंपनी सत्यजीतचीच आहे. त्याचवेळी जय खानोलकरही बिझनेस डीलसाठी सत्यजीतला भेटायला येतो. या अनपेक्षित योगायोगामुळे कथानकाला नवा आणि रोमांचक ट्विस्ट मिळणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us