
‘शो मस्ट गो ऑन’ म्हणत अभिनेता आशय कुलकर्णी (Aashay Kulkarni) मालिकेच्या पुढील शूटसाठी सज्ज झाला आहे. ‘अनिकेत’च्या परतण्याने मानसीला बळ मिळणार आहे. ‘पहिले न मी तुला’ या मालिकेचे पुढील चित्रीकरण गोव्यात सुरु झाले आहे.

आशय कुलकर्णीच्या परतण्याने मालिकेत समर आणि अनिकेतची मोठी टक्कर पाहायला मिळणार आहे. देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशावेळी महाराष्ट्रात लॉकडाऊनचा निर्णय घेऊन नियमावली कठोर करण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले आहेत.

यामध्ये मालिका, सिनेमांच्या चित्रिकरणावर पूर्णपणे बंदी आणण्यात आली आहे. त्यामुळे मनोरंजनाला ब्रेक लागू नये आणि प्रेक्षकांचं मनोरंजन अविरत सुरु राहावं म्हणून झी मराठीवरील मालिकांचं चित्रिकरण महाराष्ट्राबाहेरील राज्यात हलवावं लागलं, सध्या ‘पाहिले न मी तुला’चं शूट गोव्यामध्ये सुरु आहे.

मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत असलेला अभिनेता ‘आशय कुलकर्णी’ कोरोना पॉझिटिव्ह असल्याने मालिकेतून थोडा विराम घेतला होता, पण शो मस्ट गो ऑन म्हणत आशय नुकताच गोव्यात दाखल झालाय, अनिकेत परत येतोय. त्यामुळे आता मालिकेत बऱ्याच घडामोडी घडताना दिसणार आहेत.

अनिकेत मानसी त्यांच लग्न झालंय हे घरी सांगणार आहेत. अनिकेतच्या येण्याने मानसी मनातून खंबीर होतेय, मनूच्या मागे लागलेल्या विक्षिप्त समरला त्याचाच भाषेत उत्तर द्यायला अनिकेत-मानसी सज्ज झालेत. त्यामुळे आता समर आणि अनिकेतची टक्कर होणार हे निश्चित झालं आहे.