
झिम्बाब्वे संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू हीथ स्ट्रीक याचं निधन झालं आहे. वयाच्या 49 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून तो कर्करोगाशी झुंज देत होता. मात्र आज रविवारी दोन रात्री वाजता त्याची प्राणज्योत मालवली.

हीथ स्ट्रीक झिम्बाब्वेकडून कसोटी आणि वनडे फॉरमॅट मध्ये सर्वाधिक बळी घेतलेले आहेत. सोटीमध्ये 216 आणि वन डे मध्ये 239 बळी घेतलेत. हीथ स्ट्रीक याच्या पत्नीनेच सोशल मीडियावर त्याच्या निधनाची बातमी दिली आहे.

हीथ स्ट्रीक याच्या निधनाची आधी सुद्धा एक बातमी आली होती. मात्र ती बातमी फेक होती याबाबत त्याच्या कुटुंबीयांनीच माहिती दिली होती. त्यावेळी त्याचा सहकारी मित्र हेनरी ओलांगने ही बातमी खोटी असल्याचं सांगितलं होतं. तिसऱ्या पंचांनी त्याला परत पाठवलं असून तो जिवंत आहे, असं म्हटलं होतं.

हीथ स्ट्रीक याने 1993 साली जिम्बावे संघाकडून पदार्पण केलं होतं. स्टार ऑलराऊंडर असलेल्या हीथ स्ट्रीकने कसोटी मध्ये 9-72 अशी सर्वोत्तम कामगिरी केली. 2000 ते 2004 या कालावधीत स्ट्रीकने संघाच्या कर्णधार पदाची धुरा सांभाळली होती. यामध्ये त्याने अनेक विजय मिळवून दिले.

झिम्बाब्वे संघ मजबूत नसला तरी हीथ स्ट्रीक हा वन मॅन आर्मीसारखा लढायचा. या प्रदर्शनाच्या जोरावरच त्याने जगभरात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती.