आम्ही तुम्हाला मतदान केले, पाण्यासाठी शंभर फोन करावे लागले, बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांना तरुणाने विचारला जाब

बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांना विकास कामावरून एका तरुणाने गेवराई येथे भर कार्यक्रमात जाब विचारला आहे. तर आमचे गेवराईचे आमदार तर आम्हाला विसरूनच गेले आहेत की ते गेवराईचे आमदार आहेत की बीडचे असंही या तरुणाने संतप्त होत म्हटले आहे.

आम्ही तुम्हाला मतदान केले, पाण्यासाठी शंभर फोन करावे लागले, बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांना तरुणाने विचारला जाब
A young man asked Beed MP Bajrang Sonawane about development work.
| Updated on: Nov 13, 2026 | 9:46 PM

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांना एका अभूतपूर्व प्रसंगाचा सामना करावा लागला आहे. खासदार बजरंग सोनवणे हे बीडच्या गेवराई तालुक्यातील नारायणवाडी येथे एका कार्यक्रमानिमित्त उपस्थित होते. त्यावेळी एका तरुणाने त्यांना आम्ही पाणी मिळत नाही.आम्ही तुम्हाला मतदान केले, परंतू पाण्यासाठी शंभर फोन करावे लागले. आम्ही कोणापुढे प्रश्न मांडायचे असा जाबच या तरुणाने खासदार साहेबांना विचारला…

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांना गेवराई तालुक्यात एका कार्यक्रमात तरुणाच्या प्रश्नांना सामोरे जावे लागले.या तरुणाने आम्ही तुम्हाला मतदान केले, परंतू आम्हाला पाण्यासाठी तुम्हाला शंभर वेळा फोन करावे लागले असा जाब या तरुणाने भर व्यासपीठावर विचारला. यावेळी या तरुणाचे म्हणणे खासदार बजरंग सोनवणे यांनी शांतपणे ऐकूण घेतले. काय झाले नेमके यावेळी पाहूयात…

Loading...

आम्ही तुम्हाला मतदान केलं आहे

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे हे बीडच्या गेवराई तालुक्यातील नारायणवाडी येथे एका कार्यक्रमानिमित्त उपस्थित असताना मतदारसंघातील तरुणांनी त्यांना विकास कामावरून जाब विचारला. बजरंग बप्पा आम्ही तुम्हाला मतदान केलं आहे, पाण्यासाठी मी तुम्हाला शंभर फोन केले, आमच्या गावच्या रस्त्यांमध्ये गुडघ्या इतके खड्डे आहेत, आमचे प्रश्न आम्ही मांडायचे कुणापुढे? असा भर कार्यक्रमात सवाल उपस्थित केला. तर आमच्या गेवराईचे आमदार तर विसरूनच गेले आहेत ते गेवराईचे आमदार आहेत की बीडचे असेही या तरुणाने म्हटले आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us