अरे ला कारे करा, कोणी एक मारली तर तुम्ही चार मारा; अब्दुल सत्तार यांची चिथावणी

| Updated on: Sep 25, 2022 | 10:03 AM

सामान्य कुटुंबातला ऑटो ड्रायव्हर मुख्यमंत्री कसा होतोय, शेतकऱ्याचा पोरगा मुख्यमंत्री कसा होतोय, आतापर्यंत सोन्याच्या चमच्याने दूध पिणारेच लोक मुख्यमंत्री झालेत.

अरे ला कारे करा, कोणी एक मारली तर तुम्ही चार मारा; अब्दुल सत्तार यांची चिथावणी
अरे ला कारे करा, कोणी एक मारली तर तुम्ही चार मारा; अब्दुल सत्तार यांची चिथावणी
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नजीर खान, टीव्ही9 प्रतिनिधी, परभणी: अरे ला कारे करा. कोणी एक मारली तर तुम्ही चार मारा. मी तुमच्या पाठीमागे आहे. काही काळजी करू नका. पण हे करताना कुणावर अति करू नका. अन् कुणाची अति सहनही करू नका, असं वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे (shinde camp) नेते आणि राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार (abdul sattar) यांनी केलं आहे. सत्तार परभणीच्या (parbhani) दौऱ्यावर आहेत. परभणीच्या श्रीकृष्ण गार्डन येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

अब्दुल सत्तार यांनी यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकाही केली. सत्तार यांनी यावेळी उद्धव ठाकरेंची नक्कल करत त्यांची खिल्ली उडवली. हे घरी बसल्याने आता शिवसैनिकांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्री असताना आपल्याच पक्षातील आमदार आणि कार्यकर्त्यांना काहीच दिलं नाही. आता काय देणार? असा सवाल अब्दुल सत्तार यांनी केला.

पुढची सत्ता येण्याची स्वप्न कधी दहा जन्म बी पूर्ण होणार नाही, हे मी सांगतो, अस भाकीत सत्तारांनी वर्तवलं. मी पण कार्यकर्ता आहे. मलाही सर्व कळतं. घरात बसून, पडद्याच्या आड बसून चालत नाही. तर सरदार शिवाजी महाराजांप्रमाणे सर्वात पुढे असावा लागतो, असा टोलाही त्यांनी लगावला.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 18 अठरा तास काम करतायेत. मग मुख्यमंत्री झोपतात कधी याचा एक पोटशूळ विरोधकांना आहे. ते झोपतात कधी असं विरोधक विचारत आहेत. ते झोपतात कधी पेक्षा ते काय करू लागले हे बघा. घरात बसून जमणार नाही तर त्यासाठी मैदानात उतरावं लागतं, असा सल्ला त्यांनी दिला.

सामान्य कुटुंबातला ऑटो ड्रायव्हर मुख्यमंत्री कसा होतोय, शेतकऱ्याचा पोरगा मुख्यमंत्री कसा होतोय, आतापर्यंत सोन्याच्या चमच्याने दूध पिणारेच लोक मुख्यमंत्री झालेत. सामान्य कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणारा हा पहिला मुख्यमंत्री आहे. एकनाथ शिंदे हे गोरगरीब, कष्टकऱ्यांना सातत्याने मदत करत असतात, असंही त्यांनी सांगितलं.