पत्रकारांनी नोटेवरच्या फोटोबाबत प्रश्न विचारला, आदित्य ठाकरेंनी खोक्यांचा संदर्भ दिला…

| Updated on: Oct 27, 2022 | 3:40 PM

भारतीय चलनातील नोटेवर कुणाचा फोटो असावा यावरून सध्या चांगलंच राजकारण तापलंय. आदित्य ठाकरेंनीही त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पत्रकारांनी नोटेवरच्या फोटोबाबत प्रश्न विचारला, आदित्य ठाकरेंनी खोक्यांचा संदर्भ दिला...
Follow us on

मुंबई : भारतीय चलनातील नोटेवर कुणाचा फोटो असावा यावरून सध्या चांगलंच राजकारण तापलंय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी चलनातील नोटेवर गणपती आणि लक्ष्मीचा फोटो लावण्याचं विधान केलं आणि त्यावर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या. आपदेखील हिंदुत्वाच्या राजकारणात उतरल्याचं बोललं जात आहे. याबाबत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी आपलं मत मांडलं. यावेळी त्यांनी खोक्याचा संदर्भ दिलाय.

आदित्य काय म्हणाले?

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. नोटांवर कुणाचा फोटो यापेक्षा या नोटा लोकांच्या हातात पोहचणं जास्त महत्वाचं आहे. 50 खोके गद्दारांच्या घरी पोहचले. ते पैसे लोकांच्या मदतीला आलेले नाहीत, असं आदित्य ठाकरे म्हणालेत.

सामन्य जनतेचा आवाज दाबला जातोय. शेतकरी सध्या अडचणीत आहे. आपल्या शेतकरी बांधवाना मदत करणं सध्या गरजेचं आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

ओला दुष्काळ जाहीर करावा हीच शिंदे सरकारकडे आमची मागणी आहे. शिंदे-फडणवीस सरकारने जनतेच्या मनातील भावना जाणून तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

शिधा वाटपात काही काळंबेरं असण्याची शक्यता आहे. या शिधा पाटिकातील सगळ्या वस्तू लोकांना मिळाल्या का ते बघावं लागेल. टेंडर रेट कितीने दिला याची माहिती घ्यावी लागेल .सगळ्या वस्तू मिळाल्या का नाही मिळाल्या हे तपासावं लागेल, असं आदित्य म्हणालेत.