
मुंबई : सुमारे दीडशे वर्ष ब्रिटीशांच्या गुलामगिरीच्या जोखडात असलेला भारत 1947 साली स्वतंत्र झाला. लोकशाही स्वीकारलेल्या स्वतंत्र भारतामध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली ती 1952 साली. निवडणुकीत कॉंग्रेसला घवघवीत यश मिळाले. पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान झाले. तर, लोकसभेच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचा पहिला बहुमान हा मराठी व्यक्तीला मिळाला. आजच्या काळात पंतप्रधान यांच्या कार्यालयातून लोकसभा अध्यक्ष यांना भेटीसाठी फोन येणे ही खूप मोठी गोष्ट मानली जाते. पण, त्याकाळी पंतप्रधान नेहरू यांचा भेटीसाठी फोन आल्यावर ‘या खूर्चीचा मान मोठा आहे. त्यामुळे मीच काय इतर कोणताही अध्यक्ष कोणाच्याही दारात जाणार नाही.’ असा मराठी बाणाही त्या लोकसभा अध्यक्षांनी दाखविला होता. हा मराठी बाणा दाखविणारे पहिले लोकसभा अध्यक्ष होते गणेश वासुदेव मावळणकर. नेहरू यांना निरोप पाठवला… गणेश वासुदेव मावळणकर हे देशात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर लोकसभेचे पहिले अध्यक्ष झाले. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भेटीसाठी या असा निरोप...