VIDEO : सत्तास्थापनेनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर, दोघांमध्ये मनसोक्त गप्पा

| Updated on: Dec 08, 2019 | 9:43 PM

सत्तास्थापनेच्या नाट्यमय घडामोडीनंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट (Ajit pawar and devendra fadnavis together)  झाली.

VIDEO : सत्तास्थापनेनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर, दोघांमध्ये मनसोक्त गप्पा
Follow us on

सोलापूर : सत्तास्थापनेच्या नाट्यमय घडामोडीनंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट (Ajit pawar and devendra fadnavis together)  झाली. माढ्यामधील शाही विवाह सोहळ्यात या दोघांनी हजेरी (Ajit pawar and devendra fadnavis together)  लावली. विशेष म्हणजे हे दोघेही नेते एकत्र बसून चर्चा करतानाचा व्हिडीओही समोर आला (Ajit pawar and devendra fadnavis together)  आहे.

या व्हिडीओमध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर उपस्थित असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे मंगलाष्टके सुरु असताना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या. मंगलाष्टके संपल्यानंतर ते दोघांनीही उभे राहून वधू-वराला आशिर्वाद (Ajit pawar and devendra fadnavis together)  दिला.

सोलापुरातील करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांचा मुलगा यशवंत शिंदे यांचा शाही विवाह आयोजित करण्यात आला होता. जिंदाल कंपनीच्या शेजारी, एमआयडीसी टेंभूर्णी या ठिकाणी हा शाही विवाहसोहळा पार पडला. या विवाहसोहळ्याला अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. या विवाहसोहळ्याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित (Ajit pawar and devendra fadnavis together)  होते.

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस राजकीय सत्तानाट्यानंतर पहिल्यांदाच अशाप्रकारे एकत्र एका मंचावर पाहायला मिळाले. त्यामुळे लग्नसोहळ्यादरम्यान माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या एकत्र उपस्थितीमुळे वऱ्हाडी मंडळीत चांगलीच चर्चा रंगली होती.

अजित पवार यांनी बंडखोरी करत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शनिवारी (23 नोव्हेंबर 2019) शपथ घेतली. यानंतर अनेकांच्या त्यांच्यावर टीका केली. राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी अजित पवारांच्या मनधरणीचे अतोनात प्रयत्न केले. त्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अवघ्या 4 दिवसात (Ajit pawar and devendra fadnavis together) कोसळलं. यानंतर राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्रित येत महाविकासआघाडीने सरकार स्थापन केले.