अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणजे शरद पवार यांना दे धक्का

शिंदे फडणवीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे, यात अजित पवार यांनी जे दावे केलेले आहेत, ते धक्कादायक आहेत, अजित पवार यांनी शरद पवार यांचं नाव घेणं देखील टाळलं आहे.

अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणजे शरद पवार यांना दे धक्का
ajit pawar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 02, 2023 | 5:13 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा म्हटले जाणारे, शरद पवार यांना त्यांचे पुतणे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर धक्का दिला आहे. कारण आपण राज्यातील या पुढील सर्व निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद तसेच महापालिका निवडणूक आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ या चिन्हावरच लढवणार असल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून अजित पवार किंवा अन्य नेते शिंदे-फडणवीस सरकारसोबत जात आहेत, या त्या नेत्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचं म्हटलं आहे.

शरद पवार यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नांवर सुरुवातीला अजित पवार यांनी उत्तरं देणं टाळलं आहे. पहाटेनंतर अजित पवार यांनी दुपारचा हा केलेला भूकंप संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनला आहे. राष्ट्रवादीचे सर्व आमदार आपल्यासोबत असल्याचा अजित पवार यांचा दावा, शरद पवार यांच्यासोबत धक्कादायक असल्याचं बोललं जातंय.

अजित पवार यांच्या पहिल्या प्रतिक्रियेवरुन हे स्पष्ट होतंय, अजित पवार यांनी शरद पवार यांची इच्छा नसताना, राष्ट्रवादी शिंदे-फडणवीस सरकारसोबत पळवून नेली आहे. अजित पवार यांनी आणखी जोर देऊन म्हटलं आहे की, राष्ट्रवादीतील बहुसंख्य आमदारसोबत आहेत, सर्वच आमदार, खासदार आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपल्यासोबत असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिल्यानंतर शरद पवार हे देखील थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत, यावरुन आणखी काही बाबी स्पष्ट होणार आहेत. एकंदरीत अजित पवार यांच्या पहिल्या प्रतिक्रियेवरुन राष्ट्रवादी आपल्यासोबत असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे.