AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar News : डबल इंजीन सरकारला आणखी एक डबा जोडला, राजकीय भुकंपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रीया

अजीत पवार यांनी सत्तेच्या नावेत प्रवेश केल्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रीया येण्यास सुरू झाल्या आहे. मनसे प्रमुख राज ठकरे यांनीही आपली प्रतिक्रीया दिली आहे. उद्धव ठाकरे यांचं ओझ शरद पवारांना उतरवायचं होतं त्याचा पहिला अंक आज पार पडला.

Ajit Pawar News : डबल इंजीन सरकारला आणखी एक डबा जोडला, राजकीय भुकंपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रीया
मुख्यमंत्रा एकनाथ शिंदेImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 02, 2023 | 4:00 PM
Share

मुंबई :  राष्ट्रवादीचे नेते अजीत पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून अपल्या सहकारी आमदारांसोबत भाजप आणि शिवसेनेशी हात मिळवणी केली. महाराष्ट्राच्या राजकारणातला हा दुसरा रादकीय भुकंप आहे. अजीत पवार यांच्या सह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्री (NCP MLA) पदाची शपथ घेतली. तर अजीत पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान या शपथ विधीला आमचा पाठींबा नसल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. राज्याच्या राजराकणार घडलेल्या या मोठ्या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलेले आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली पहिली प्रतिक्रीया दिलेली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अजीत पवार यांनी राष्ट्रवादीला सोडचीठ्ठी देऊन भाजप आणि शिवसेनेशी हात मिळवणी केल्यानंतर उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला प्रतिक्रीया दिली आहे. डबल इंजीनच्या सरकारला आता आणखी एक डबा जोडला गेला आहे. आता या सरकारचा विकास बुलेट ट्रेनच्या गतीने होईल असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

राज ठाकरे यांची प्रतिक्रीया

अजीत पवार यांनी सत्तेच्या नावेत प्रवेश केल्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रीया येण्यास सुरू झाल्या आहे. मनसे प्रमुख राज ठकरे यांनीही आपली प्रतिक्रीया दिली आहे. उद्धव ठाकरे यांचं ओझ शरद पवारांना उतरवायचं होतं त्याचा पहिला अंक आज पार पडला. शरद पवारांची पहिली टिम रवाना झाली आहे, लवकरच दुसरीही टिम त्या दिशेने जाईल असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. थोडक्यात राज ठकरे यांचा इशारा हा शरद पवारांकडे असल्याचा दिसतो.

अजीत पवारांना 40 आमदारांचा पाठिंबा

अजीत पवारांना राष्ट्रवादीच्या 40 पेक्षा आमदारांचा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे देवेंद्र फडणवीस  दुसरा मोठा पक्ष फोडण्यास यशस्वी झाले आहेत. प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळांसारखे नेते अजीत पवारांसोबत गेल्याने पक्ष बंडखोरीची कारवाई टळेल का अशी चर्चाही आहे.

Follow Us
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....