Ajit Pawar Plane Crash : रोहित पवार यांचा आरोपांचा धमाका, नागरी उड्डाण मंत्रालयाची प्रतिक्रिया काय? VSR बाबत मोठा खुलासा

अजित पवार यांचा पुतण्या, एनसीपी नेते रोहित पवार यांनी काल मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषेदत काही गंभीर आरोप लावले होते. 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या लिअरजेट विमान अपघाताशी संबंधित व्हीएसआर कंपनीला संरक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांच्या जवळच्या सूत्रांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

Ajit Pawar Plane Crash : रोहित पवार यांचा आरोपांचा धमाका, नागरी उड्डाण मंत्रालयाची प्रतिक्रिया काय? VSR बाबत मोठा खुलासा
विमान अपघातावरूनरोहित पवार यांनी केले होते गंभीर आरोप
| Updated on: Feb 19, 2026 | 8:26 AM

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. 28 जानेवारीला त्यांचं विमान बारामतीजवळ कोसळलं आणि त्यात अजित पवार यांच्यासह एकूण 5 जणांचा मृत्यू झाला. मात्र हाँ अपघात नसून तो घातपात असल्याची शंका गेल्या काही दिवसांपासून बोलून दाखवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार, अजित पवार यांचे पुतळे रोहित पवार यांनी काही पत्रकार परिषदा घेऊन या अपघाताबद्दल शंका व्यक्त केल्या. तर काल त्यांनी मुंबईत आणखी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली ज्यामध्ये त्यांनी व्हीएसआर कंपनीबद्दल अनेक दावे करत या कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचाही आरोप केला.

सत्ताधाऱ्यांकडून कंपनी वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा थेट आरोपही रोहित पवार यांनी लावला. मात्र त्यांच्या या विधानानंतर मोठी खळबळ माजली असून रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांनंतर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांच्याकडून स्पष्टीकरण समोर आलं आहे. मंत्र्यांच्या जवळच्या सूत्रांनी रोहित पवार यांचे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले. व्हीएसआर कंपनीच्या विमान अपघातात, अजित पवार यांचा मृत्यू झाला, मात्र तेलुगू देसम पक्ष (TDP) किंवा मंत्र्यांचा व्हीएसआर या विमान कंपनीशी कोणताही संबंध नाही असे त्यांनी सांगितले, अशी माहिती समोर आली आहे.

केंद्रीय मंत्र्याला पदावरून दूर करा, रोहित पवारांची मागणी

काल, बुधवारी सकाळी रोहित पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत मंत्री नायडू यांचं उघडपणे नाव न घेता, त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या लिअरजेट विमान अपघाताशी संबंधित VSR कंपनीला संरक्षण देण्यासाठी, वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. मंत्री नायडू आणि काही वरिष्ठ टीडीपी नेत्यांचे, VSR कंपनीच्या मालकांशी जवळचे संबंध आहेत असा दावा करत रोहित पवार यांनी केला. याप्रकरणाची चौकशी होईपर्यंत टीडीपीच्या (त्या) मंत्र्याला वेगळी जबाबदारी द्यावी, या पदावरून त्यांना दूर करा, त्यांना या पदावरून काढण्यात यावं अशी मागणीही रोहित पवारांनी केली.

28 जानेवारी रोजी अजित पवारा हे काही संभासाठी मुंबईबून बारामतील जात होते, तेव्हा त्याचं विमान कोसळून अपघात झाला. त्यात 5 जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले. रोहित पवार यांनी दावा केला की अपघातामागे राजकीय कारणे असू शकतात, मात्र याला अधिकृतपणे पुष्टी मिळालेली नाही.

मंत्र्यांनी फेटाळले दावे

मात्र रोहित पवारांचे हे दावे, आरोप हे, मंत्र्यांच्या जवळच्या लोकांनी फेटाळून लावले आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना, नागरी उड्डाण मंत्री आणि मंत्रालयातील उच्च अधिकाऱ्यांच्या जवळच्या सूत्रांनी हे आरोप निराधार असल्याचं सांगितलं. टीडीपी किंवा मंत्री राममोहन नायडू यांचा व्हीएसआर कंपनीशी कोणताही संबंध नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. या विमान अपघाताची पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी करण्यासाठी मंत्रालय वचनबद्ध आहे. सर्व आवश्यक पावले उचलण्यात आली आहेत आणि कोणालाही संरक्षण देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असंही त्यांनी नमूद केलं.