AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : आज दुपारनंतर खूप मोठ्या प्रमाणात.. मुख्यमंत्र्यांची जनतेला कळकळीची विनंती

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात पावसामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल माहिती दिली. त्यांनी राज्यातील जनतेला एक कळकळीची विनंती केली आहे.

Devendra Fadnavis : आज दुपारनंतर खूप मोठ्या प्रमाणात.. मुख्यमंत्र्यांची जनतेला कळकळीची विनंती
Devendra Fadnavis
| Updated on: Jul 06, 2026 | 11:44 AM
Share

“मुंबईत दरवर्षी मान्सूनमध्ये सरासरी 800 झाडं कोसळतात. पण काल एकाच दिवसात 350 झाडं पडली. आजचा दिवस त्यापेक्षाही गंभीर आहे. म्हणून वर्क फ्रॉम होमची विनंती केली. दुपारनंतर ताशी 70 ते 90 किलोमीटर वेगाने वार वाहणार आहेत” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. “आज दुपारनंतर खूप मोठ्या प्रमाणात वारं असणार आहे. त्याचा झाडांवर परिणाम होऊ शकतो. त्या दृष्टीने लोकांनी सजग राहणं आवश्यक आहे. लोकांनी सावध रहावं. शक्यतो प्रवास टाळावा. अत्यंत गरजेचं असल्याशिवाय प्रवास करु नये. युवा वर्गाला विशेष आवाहन आहे, आजचं वारं बघता त्यांनी टूरिजम टाळावं” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केलं.

“निसर्गाच्या माध्यमातून एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या गोष्टी गंभीर आहेत. पण काल साधारणतः ५० किमी ताशी वारे वाहत होते” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. “कालची घटना दु:खद आहे. पण काल जी इमारत पडली, ती बेकायदेशीर होती. त्या इमारती मधील लोक नाहीत, पण ती इमारत ज्या शेजारच्या झोपडीवर पडली, त्यातल्या लोकांचा मृत्यू झाला. या सगळ्या घटना गंभीर आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले. मुंबई-पुणे महामार्ग बंद आहे. या घटना आहेत त्या निसर्गामुळे निर्माण झालेल्या आहेत. संपूर्ण महापालिका, आपत्कालीन कक्ष पूर्ण पणे रस्त्यावर उतरून सामना करत आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

खूप लोक अडकली नाहीत

“कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळल्यानंतर लगेच यंत्रणा सज्ज होती. खूप लोक अडकली नाहीत. लगेच वाहतूक परावर्तित केली. गाड्या बाहेर काढत आहोत. आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. मंत्री गिरीश महाजन रात्री 1 वाजता मानखुर्द येथे होते” अशी माहिती फडणवीस यांनी दिली. “झालेल्या घटना व त्यावर केलेली कार्यवाही तसेच तयारी आधीच केलेली आहे. मला राजकीय बोलायचे नाही. त्याने झालेले मृत्यू परत आणता येत नाहीत. आजचा दिवस महत्वाचा आहे. आज अर्धवट निवेदन करण्याऐवजी सभागृहासमोर उद्या संपूर्ण निवेदन करेन” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ