केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार, इतकेच काय तर शिंदे गट…
केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून दोन डझन मंत्र्यांमध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, धर्मेंद्र प्रधान यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे, तर एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटालाही प्रत्येकी एक मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. काही मंत्र्यांची खाती बदलली जातील आणि जबाबदाऱ्या वाढवल्या जातील.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या विस्तारामध्ये जवळपास दोन डझन मंत्र्यांमध्ये बदल अपेक्षित असून काही नवे चेहरे मंत्रीमंडळात समाविष्ट होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, धर्मेंद्र प्रधान यांना पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रीमंडळात संधी मिळण्याची चर्चा आहे. त्यांच्याकडे दुसऱ्या खात्याचा पदभार दिला जाऊ शकतो. याशिवाय, केंद्रीय मंत्रीमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता असून सुमारे १२-१३ मंत्र्यांची खाती बदलली जाऊ शकतात. काही मंत्र्यांकडील महत्त्वाची खाती कमी केली जातील, तर काही मंत्र्यांवरील जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता असून डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. तसेच, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही एक मंत्रीपद मिळेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. द्रमुकलाही केंद्रीय मंत्रीमंडळात संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पियुष गोयल हे त्यांची दोन्ही पदे कायम ठेवतील, अशीही माहिती मिळत आहे.
Published on: Aug 19, 2026 11:45 AM
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार...
चिमुकलीला गपचूप शेतात नेलं अन्... आमदाराच्या गावातच हादरवणारा प्रकार,
ओमराजेंच्या पाठोपाठ ठाकरेंचे नगरसेवकही... धाराशिवच्या राजकारणात आजचा..
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल

