‘भाजपचा पोपट पिंजऱ्यात अडकला’, शिवसेनेचा टोला!, तर ‘पोपट आम्ही नाही, शिवसेनाच पाळते’, भाजपचं प्रत्युत्तर

| Updated on: Nov 04, 2020 | 3:12 PM

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना झालेल्या अटकेनंतर शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शिवसेना नेते अनिल परब यांनी गोस्वामींची अटक आणि सरकारचा काही संबंध नसल्याचं म्हटलंय. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध

भाजपचा पोपट पिंजऱ्यात अडकला, शिवसेनेचा टोला!, तर पोपट आम्ही नाही, शिवसेनाच पाळते, भाजपचं प्रत्युत्तर
Follow us on

मुंबई: रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अटकेवरुन शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. गोस्वामी यांच्या अटेकवर ‘भाजपचा पोपट पिंजऱ्यात अडकला’ अशी खोचक टीका परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी केली आहे. तर अर्णव गोस्वामी आमचा पोपट नाही, आम्ही पोपट पाळत नाहीत. पोपट तेच पाळतात असा प्रत्यारोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तर अर्णव गोस्वामी यांच्या अटेकाचा चंद्रकांत पाटील यांनी निषेध व्यक्त केलाय. (Allegations of Shiv Sena leader Anil Parab and BJP leader Chandrakant Patil)

गोस्वामींच्या अटकेचा भाजपकडून निषेध

अर्णव गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात नागपुरात निदर्शनं करण्यात आली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी सरकारच्या कारवाईचा निषेध व्यक्त केला. यावेळी पाटील यांनी डोक्यावर काळी टोपी आणि खांद्यावर काळा रुमाल घेतला होता. अर्णव गोस्वामी यांची अटक म्हणजे पत्रकारितेची गळचेपी असल्याचा आरोप पाटील यांनी केला. आणीबाणी असल्यासारखं काहीही केलं तरी चालतं या भ्रमात सोनिय गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी राहू नये, असा सूचक इशाराही पाटील यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजप नेते असं काही ओरडत आहेत, जसं की तो भाजपचाच कार्यकर्ता आहे, असा खोचक टोला अनिल परब यांनी भाजपला लगावला आहे. ही कारवाई सूडबुद्धीनं झालेली नाही. राज्य सरकारचा या प्रकरणाशी संबंध नाही. नाईक कुटुंबिय कोर्टात गेले आणि त्यांना तपासाची परवानगी मिळाली, असं अनिल परब म्हणाले. पण भाजपकडून गोस्वामी यांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप अनिल परब यांनी केला आहे. एका मराठी महिलेचं कुंकु ज्याने पुसलं, त्याला वाचवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु असल्याचा गंभीर आरोप परब यांनी केलाय. तसंच गोस्वामी यांच्या अटकेचा वृत्तपत्र स्वातंत्र्याशी काही संबंध नसल्याचा दावाही परब यांनी केला आहे.

संबंधित बातम्या:

नववीत असताना अन्वय नाईकांच्या प्रेमात पडले, गोस्वामींच्या अटकेने करवाचौथला फळ, अक्षता नाईक गदगदल्या

सुशांतची सुसाईड नोट नव्हती, मात्र माझ्या वडिलांच्या सुसाईड नोटमध्ये अर्णवचं नाव, तरीही कारवाई का नाही? : नाईक कुटुंब

अर्णव गोस्वामींच्या अटकेवर सोनिया गांधी आणि पवारांनी भूमिका स्पष्ट करावी, आशिष शेलारांचं आवाहन

Allegations of Shiv Sena leader Anil Parab and BJP leader Chandrakant Patil