Loksabha Election 2024 : POK म्हणजे दुसऱ्या देशाची जमीन, इंडिया आघाडीच्या उमेदवाराने उधळली मुक्ताफळ

Loksabha Election 2024 : भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी पाकव्याप्त काश्मीरचा भारतामध्ये समावेश करण्याबद्दल वक्तव्य केली आहेत. POK पुन्हा घेणार असं भाजपा म्हणत आहे. त्याचवेळी इंडिया आघाडीच्या उमेदवाराने एक वक्तव्य केलय, त्यावरुन वाद निर्माण होऊ शकतो.

Loksabha Election 2024 : POK म्हणजे दुसऱ्या देशाची जमीन, इंडिया आघाडीच्या उमेदवाराने उधळली मुक्ताफळ
lalitesh tripathi
| Updated on: May 23, 2024 | 12:36 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अलीकडेच पाकव्याप्त काश्मीरचा भारतामध्ये समावेश करण्याबद्दल वक्तव्य केलं होतं. शाह यांच्या या वक्तव्यावर भदोही लोकसभा मतदारसंघातील उमेदवार ललितेश पती त्रिपाठी यांनी टीका केली आहे. “भाजपाला विकासाच्या मुद्यावर जनसमर्थन मिळत नाहीय. विकासाच्या मुद्यावरुन निवडणुकीला भरकटवण्यासाठीच सराकर असे मुद्दे काढतेय” असं ललितेश पती त्रिपाठी म्हणाले. ललितेश त्रिपाठी एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यानंतर ते जे बोलले, त्यावरुन वाद आणखी वाढू शकतो.

“भारत सरकार जर पीओके परत घेण्याबद्दल बोलत असेल. याचाच अर्थ तुम्ही दुसऱ्या देशाची जमीन घेण्याची आणि युद्धाची घोषणा करताय. पीओके एकवेळ भारताचा भाग होता. एका राजकीय मंचावरुन युद्धाची घोषणा करु नये. देशाची बेसिक गोष्टींसाठी झुंज सुरु असताना ही युद्धावर जाण्याची वेळ नाहीय” असं ललितेश त्रिपाठी म्हणाले.

80 पैकी 79 सीट जिंकणार अखिलेश यादव यांचा दावा

उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत. काँग्रेस पक्ष 17 जागांवर निवडणूक लढवत आहे. उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीच नेतृत्व समाजवादी पार्टीकडे आहे. समाजवादी पार्टी 62 जागांवर निवडणूक लढत आहे. भदोहीची सीट इंडिया आघाडीने तृणमूल काँग्रेससाठी सोडली आहे. ललितेश त्रिपाठी या जागेवरुन निवडणूक लढवतोय. इंडिया आघाडी उत्तर प्रदेशात 80 पैकी 79 सीट जिंकणार असा अखिलेश यादव यांचा दावा आहे.


काँग्रेस उमेदवार कितव्या नंबरवर होता?

भारतीय जनता पार्टीने भदोहीमधून विनोद कुमार बिंद यांना उमेदवारी दिली आहे. बहुजन समाज पार्टीकडून हरिशंकर निवडणूक रिंगणात आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या रमेशचंद बिंद यांना 5 लाख 10 हजार मत मिळाली होती. बिंद यांनी त्यावेळी बहुजन समाज पार्टीच्या रंगनाथ मिश्रा फार कमी फरकाने हरवलं होतं. तिसऱ्या नंबरवर काँग्रेस पक्षाकडून रमाकांत यादव होते. यादव यांना जवळपास 25 हजार मत मिळाली होती.