Amit Thackeray : शिंदेंच्या बंडाने शिवसेना घायाळ, मनसेला संधी, अमित ठाकरेंची कोकण टीम तयार, नव्या टीममध्ये कोण कोण? वाचा

| Updated on: Jul 16, 2022 | 8:15 PM

जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयात मनविसेचे युनिट स्थापन करा, आगामी सिनेट निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागा आणि अधिकाधिक पदवीधरांची नोंदणी करा असे आदेशही त्यांनी या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

Amit Thackeray : शिंदेंच्या बंडाने शिवसेना घायाळ, मनसेला संधी, अमित ठाकरेंची कोकण टीम तयार, नव्या टीममध्ये कोण कोण? वाचा
अमित ठाकरे
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई – एककीकडे एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्या बंडामुळे शिवसेना घायाळ (Shivsena) झाली असताना दुसरीकडे मनसे कमबॅकची संधी शोधत आहे. ऐन पावसाळ्यात अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी कोकण पिंजून काढलंय. मुसळधार पाऊस कोसळत असतानाही सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या तीन जिल्ह्यांचा सात दिवसीय मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क दौरा करून मुंबईत परतल्यावर चारच दिवसात अमित ठाकरे यांनी त्यांची कोकण टीम जाहीर केली आहे. या तिन्ही जिल्ह्यातील मनविसेचे जिल्हाध्यक्ष त्यांनी आज जाहीर केले तसंच या सर्वांना मुंबईत बोलावून त्यांना नेमणूक पत्रही दिले. जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयात मनविसेचे युनिट स्थापन करा, आगामी सिनेट निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागा आणि अधिकाधिक पदवीधरांची नोंदणी करा असे आदेशही त्यांनी या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

नवनिर्वाचित पदाधिकारी यादी जाहीर

  1. श्री अमोल साळुंके,जिल्हा संपर्क अध्यक्ष (रत्नागिरी व सिंधुदुर्ग)
  2. श्री पुष्पेन दिवटे,जिल्हा अध्यक्ष उत्तर रत्नागिरी (खेड,दापोली,मंडणगड,चिपळूण,गुहागर)
  3. श्री गुरूप्रसाद चव्हाण,जिल्हा अध्यक्ष,दक्षिण रत्नागिरी ( राजापूर,लांजा,संगमेश्वर,रत्नागिरी)
  4. श्री निलेश मेस्त्री,जिल्हा अध्यक्ष उत्तर सिंधुदुर्ग ( वैभववाडी,देवगड,मालवण,कणकवली)
    श्री सुधीर राऊळ,जिल्हा अध्यक्ष दक्षिण सिंधुदुर्ग
    (सावंतवाडी,दोडामार्ग,वेंगुर्ला,कुडाळ)
  5. श्री प्रसन्न बनसोडे, जिल्हा अध्यक्ष मध्य रायगड
    (कर्जत, खालापूर, पेण,सुधागड, अलिबाग, मुरुड)
  6. श्री प्रतिक रहाटे, जिल्हा अध्यक्ष, दक्षिण रायगड (महाड, पोलादपूर, रोहा, माणगाव, हसळा, तळा, श्रीवर्धन)
  7. श्री अनिकेत ओझे,जिल्हा अध्यक्ष (उत्तर रायगड -पनवेल, उरण)
  8. श्री अनिकेत मोहिते,शहर अध्यक्ष
    (पनवेल महानगर)
  9. श्री गौरव डोंगरे,तालुका संपर्क अध्यक्ष (रत्नागिरी तालुका)
  10. श्री चिन्मय वार्डे,तालुका संपर्क अध्यक्ष (अलिबाग तालुका

मनसेला मोठी संधी

मनसे नेते अमित ठाकरे यांनी कोकण दौरा करत ही दहा जणांची तगडी टीम तयार केली आहे. आगामी काळात महापालिका निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकात चांगली कामगिरी बजावण्याची जबाबदारी या दहा जणांवर असणारा आहे. तर दुसरीकडे शिवसेनेतली पडझड अजूनही सुरूच आहे. आज ही अनेक नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन देत ठाकरेंना आणखी एक धक्का दिला आहे. त्यामुळे मनसेसाठी हे सर्वात मोठे संधी असणार आहे. शिंदे आणि ठाकरेंच्या भांडणात मनसेची मतं आगामी निवडणुकीत नक्कीच वाढू शकतात, असा अंदाजही अनेक राजकीय पंडित बांधत आहेत. तसेच अलिकडे भाजप आणि मनसेची जवळीकही चांगलीच वाढली आहे. त्याच्याही बऱ्याच चर्चा आहेत. आगामी निवडणुकीत भाजप आणि मनसेची युती झाली तर कुणालाही आश्चर्य वाटणार नाही.