AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई महापालिकेत मनसे, शिंदे गट युती होणार?, अमित ठाकरे म्हणतात…

मुंबई महापालिकेसाठी मनसे (MNS) आणि शिंदे गट युती करणार का? यावर मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई महापालिकेत मनसे, शिंदे गट युती होणार?, अमित ठाकरे म्हणतात...
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Sep 10, 2022 | 1:38 PM
Share

मुंबई :  महापालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. जवळपास सर्वच राजकीय पक्षाकडून निवडणुकीच्या तायारीला सुरुवात झाली आहे.  यंदा राज्यात  ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक अटीतटीची होऊ शकते असा अंदाज बांधला जात आहे.  या सर्वांमध्ये प्रमुख्याने एका मुद्द्यावर सध्या सर्वाधिक चर्चा होत आहे. ती म्हणजे मुंबई महापालिकेसाठी मनसे (MNS) आणि शिंदे गट युती करणार का? याबाबत मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना विचारले असता युतीबाबतचा अंतिम निर्णय हा राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा असेल असं त्यांनी म्हटलं आहे.  काही दिवसांपासून मनसे आणि शिंदे गटातील नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याने युतीच्या चर्चेला उधाण आले आहे.

राज ठाकरे, शिंदे भेट

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले होते. तेव्हापासून महापालिकेच्या निवडणुकीसाठी मनसे आणि शिंदे गटाची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र ही राजकीय भेट नव्हती असं तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं.

दरम्यान त्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मनसे नेते आणि शिंदे गटातील नेते यांच्या वाढत्या भेटीगाठी पहाता युतीचा अंदाज वर्तवला जात आहे. याबाबत अमित ठाकरे यांना विचारले असता त्याबाबत राज ठाकरे हेच निर्णय घेतील असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंनी बोलावली बैठक

दरम्यान दुसरीकडे राज ठाकरे यांनी मनसे नेते आणि सरचिटणीसांची एक महत्त्वापूर्ण बैठक बैठक बोलावली आहे. येत्या 12 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता मुंबईत ही बैठक पार पडणार आहे. राज ठाकरे हे 18 सप्टेंबरपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. विदर्भ दौऱ्यापूर्वी राज ठाकरे यांनी ही बैठक बोलावली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावली असावी असा अंदाज बांधला जात आहे.

Follow Us
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
Nanded | दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...