महाराजसाहेब विरोध तुम्हाला नाही, महाराष्ट्राच्या छातीवर वरवंटा फिरवणाऱ्यांना : अमोल कोल्हे

| Updated on: Oct 14, 2019 | 9:36 PM

महाराज विरोध तुम्हाला नाही. पण महाराष्ट्राच्या छातीवर बेरोजगारीचा वरवंठा फिरवणारे, शेतकरी आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या भाजप सरकारला आम्ही विरोध केल्याशिवाय गप्प बसणार नाही

महाराजसाहेब विरोध तुम्हाला नाही, महाराष्ट्राच्या छातीवर वरवंटा फिरवणाऱ्यांना : अमोल कोल्हे
Follow us on

सातारा : महाराज विरोध तुम्हाला नाही. पण महाराष्ट्राच्या छातीवर बेरोजगारीचा वरवंठा फिरवणारे, शेतकरी आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या भाजप सरकारला आम्ही विरोध केल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशी अप्रत्यक्ष टीका (Amol kolhe criticism on udayanraje bhosale) खासदार अमोल कोल्हे यांनी उदयनराजेंवर केली आहे. आज (14 ऑक्टोबर) साताऱ्यातील कोरेगाव मतदारसंघात उमेदवार शशिकांत शिंदेच्या प्रचारसभेत ते बोलत (Amol kolhe criticism on udayanraje bhosale) होते.

साता-यातील कोरेगाव मतदारसंघात आज राष्ट्रवादीची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ खटाव तालुक्यातील डिस्कळ येथे झालेल्या सभेत खासदार अमोल कोल्हेंनी उदयनराजेंवर अप्रत्यक्ष टीका केली. यावेळी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.

“ज्या दिल्लीच्या तक्तालाही छत्रपती शिवाजी महाराजांनी डोळे दाखवले होते. त्या तक्ता समोर महाराष्ट्राची मान झुकू नये ही एक भावना उदयनराजेंच्या भाजपा प्रवेशाबाबत होती. उदयनराजे उमंद व्यक्तिमत्व आहे. परंतु महाराष्ट्राच्या छातीवर ज्यांनी वरवंटा फिरवलाय, शेतकरी आत्महत्ये प्रकरणी जे कारणीभूत आहेत, त्या भाजपा सरकारला आम्ही विरोध केल्याशिवाय गप्प बसणार नाही”, अशी अप्रत्यक्ष टीका उदयनराजेंवर अमोल कोल्हे यांनी केली.

राष्ट्रवादीतर्फे विधनासभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जोरदार प्रचार सुरु आहे. राष्ट्रवादीकडून शरद पवार, जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ आणि अमोल कोल्हे निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. तर भाजपकडून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली जात आहे.

दरम्यान, येत्या 21 ऑक्टोबर रोजी हरियाणासह महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकींसाठी मतदान होणार आहे. तर 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.