ऋतुजा लटकेंना राजीनामा मिळालाच नाही तर..? डोन्ट वरी! शिवसेनेचा ‘प्लान बी’ रेडी

| Updated on: Oct 13, 2022 | 10:10 AM

ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरुन राजकारण तापलं! आज हायकोर्टात सुनावणी, सुनावणीआधीच समोर आली मोठी घडामोड

ऋतुजा लटकेंना राजीनामा मिळालाच नाही तर..? डोन्ट वरी! शिवसेनेचा प्लान बी रेडी
नेमका प्लान बी काय?
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मनोज लेले, TV9 मराठी, मुंबई : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Andheri By poll election) पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. ऋतुजा लटके (Rutuja Lakate) यांना ठाकरे यांनी उमेदवारी द्यायचं पक्क केलंय. पण त्यात त्यांच्या नोकरीच्या राजीनाम्याचा मुद्दा आड आल्यामुळे पुन्हा एकदा न्यायालयीन लढा देण्याची वेळ ठाकरेंवर ओढावली. कोर्टात ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) बाजूने निर्णय लागला तर ठीक.. पण नाहीच लागला, तर काय करायचं? यासाठीचा प्लान बी देखील उद्धव ठाकरे गटाकडून तयार असल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेनेचे दिवंगत नेते आणि अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर त्यांच्या जागेची निवडणूक होऊ घातली आहे. ही पोट निवडणूक प्रतिष्ठेची मानली जातेय. शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर लिटमस टेस्ट म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जात असल्यानं राजकीय डावपेच काय आखायचे, रणनिती काय ठेवायची, याची रुपरेषा तयार ठेवण्यासाठी शिवसेनेचा प्लान बी देखील सज्ज आहे.

समोर आलेल्या माहिनीनुसार, ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंच्या नोकरीचा राजीनामा अद्याप मुंबई महापालिकनं अद्याप मंजूर केलेला नाही. त्यामुळं या विरोधात ऋतुजा लटकेंनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

हे सुद्धा वाचा

3 पर्याय तयार

दुसरीकडे जर ऋतुजा लटकेंचा राजीनामा न स्वीकारल्यास ठाकरे गटानं प्लॅन बी तयार ठेवलाय. कमलेश राय, प्रमोद सावंत, तसेच दिवंगत रमेश लटके यांच्या मातोश्री यांचं नाव अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवार म्हणून चर्चेत असल्याचं कळतंय.

दुसरीकडे ऋतुजा लटकेंच्या याचिकेवरील सुनावणीकडे भाजप नेत्यांचंही बारीक लक्ष लागलंय. कोर्टाच्या निकालानंतर अंधेरी पोटनिवडणुकीतील उमेदवारीबाबत भाजपकडून निर्णय घेण्यात येणार आहे.

आजऐवजी उद्या!

खरंतर शिंदे गट आणि भाजप यांच्या युतीचे उमेदवार म्हणून मुरजी पटेल यांच्याकडे पाहिलं जातंय. मुरजी पटेल हे आज खरंतर आपला उमेदवारी अर्ज भरणार होते. पण काही कारणास्तव ते आजच्या ऐवजी उद्या उमेदवारी अर्ज भरणार असल्याचंही कळतंय. या राजकीय घडामोडींची अनेक अर्थ लावले जात आहेत.

ऋतुजा लटके या बीएमसी कर्मचारी असल्याने त्यांना तिथे राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यानंतर त्या निवडणुकीला सामोरं जावू शकतील. मात्र राजीनामा देऊनही त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्यानं राजकारण तापलंय.

एकीकडे ठाकरे गटाकडून हा राजीनामा मंजूर करु नये असा आयुक्तांवर दबाव शिंदे गट टाकत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने आपल्यावरील आरोप फेटाळून लावलेत. या सगळ्या प्रकरणी ठाकरे गटाने मुंबई हायकोर्टात अखेर दाद मागितलीय.