मोदींवर टीका झाल्यावर वाईट वाटतं, अरुण गवळीच्या पत्नीकडून मोदींची स्तुती

औरंगाबाद : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या पत्नीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भरभरुन स्तुती केली आहे. नरेंद्र मोदी हे चांगले पंतप्रधान आहेत, अशा शब्दात अरुण गवळीची पत्नी आशा गवळी यांनी मोदींचं कौतुक केलं. तसेच, भाजप चांगला पक्ष असून, आम्ही भाजपसोबत युती करायला तयार आहोत, असेही आशा गवळी यांनी म्हटले. जालना लोकसभा मतदार संघातील उमेदवाराच्या प्रचारासाठी त्या औरंगबदला […]

मोदींवर टीका झाल्यावर वाईट वाटतं, अरुण गवळीच्या पत्नीकडून मोदींची स्तुती
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

औरंगाबाद : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या पत्नीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भरभरुन स्तुती केली आहे. नरेंद्र मोदी हे चांगले पंतप्रधान आहेत, अशा शब्दात अरुण गवळीची पत्नी आशा गवळी यांनी मोदींचं कौतुक केलं. तसेच, भाजप चांगला पक्ष असून, आम्ही भाजपसोबत युती करायला तयार आहोत, असेही आशा गवळी यांनी म्हटले. जालना लोकसभा मतदार संघातील उमेदवाराच्या प्रचारासाठी त्या औरंगबदला आल्या आहेत.

आशा गवळी नेमकं काय म्हणाल्या?

“भाजप हा एक चांगला पक्ष आहे. आम्ही भाजपसोबत युती करायला तयार आहोत. नरेंद्र मोदी हे चांगले पंतप्रधान आहेत. पण त्यांच्यावर जी टीका होते, त्यामुळे वाईट वाटतं.” असे म्हणत आशा गवळी पुढे म्हणाल्या, “येणाऱ्या विधानसभा निवडणुका आम्ही लढवणार आहोत. महाराष्ट्रात सर्वत्र आम्ही उमेदवार देणार आहोत.”

“सध्या देशात राजकारणासाठी पैशांचा बाजार सुरु आहे. हे बदलण्यासाठी आम्ही राजकारणात उमेदवार दिला आहे.”, असेही आशा गवळी यांनी यावेळी म्हटले. तसेच, मी निवडणूक लढवणार नाही मात्र माझ्या मुलीला विधानसभेला उभं करणार आहे. माझी मुलगी खूप चांगलं काम करत आहे, असे आशा गवळी यांनी नमूद केले.

कोण आहेत आशा गवळी?

आशा गवळी या अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांची पत्नी आहे. अरुण गवळी सध्या शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. अरुण गवळीने एकेकाळी मुंबईमध्ये आपली दहशत निर्माण केली होती. कुख्यात गुंड आणि अंडरवर्ल्ड डॉन म्हणून अरुण गवळीची गुन्हेगारी विश्वात ओळख आहे.

अरुण गवळी यांची कन्या गीता गवळी या राजकारणात आहे. त्यात आता आशा गवळी यांनी भाजपसोबत युतीची इच्छा व्यक्त केली असून, मोदींचं कौतुकही केले असल्याने, पुढे गवळी कुटुंब भाजपच्या जवळ जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आशा गवळी अधिकृतरित्या भाजपच्या व्यासपीठावर दिसतात का आणि दिसल्या तर शिवसेनेची यावर भूमिका काय असेल, याची उत्सुकता आता सगळ्यांना आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.