वंचितच्या जागांवरही उमेदवार, एमआयएमची पाचवी यादी जाहीर

| Updated on: Sep 27, 2019 | 5:35 PM

पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी स्वतः ट्वीट करून यादी जाहीर (fifth list of AIMIM candidates) केली. औरंगाबाद पूर्व गफार कादरी, औरंगाबाद मध्य नासेर सिद्दीक्की आणि औरंगाबाद पश्चिम अरुण बोर्डे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

वंचितच्या जागांवरही उमेदवार, एमआयएमची पाचवी यादी जाहीर
Follow us on

औरंगाबाद : एमआयएमने पाचवी यादीही जाहीर (fifth list of AIMIM candidates) केली आहे, ज्यात औरंगाबाद शहरातील तीनही मतदारसंघाचे उमेदवार घोषित करण्यात आले आहे. पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी स्वतः ट्वीट करून यादी जाहीर (fifth list of AIMIM candidates) केली. औरंगाबाद पूर्व गफार कादरी, औरंगाबाद मध्य नासेर सिद्दीक्की आणि औरंगाबाद पश्चिम अरुण बोर्डे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने दावा केलेल्या जागेवरही एमआयएमने उमेदवार घोषित केले आहेत. औरंगाबाद मध्य आणि औरंगाबाद पश्चिम मतदारसंघावर वंचितने दावा केला होता. एमआयएमने या दोन्ही मतदारसंघात उमेदवार घोषित केल्यामुळे दोन्ही पक्षांची पुन्हा आघाडी होण्याची आशा धूसर झाली आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमने राज्यात दोन जागांवर विजयम मिळवला होता, त्यापैकी एक भायखला आणि दुसरा औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ होता. विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादेत एमआयएमचा झेंडा फडकवला होता. त्यांनी शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल यांचा पराभव केला होता.

एमआयएमची पहिली यादी

डॅनियल रमेश लांडगे, वडगाव शेरी, पुणे
मुफ्ती मोहम्मद इस्माईल खलिक, मालेगाव मध्य
मोहम्मद फिरोज खान, नांदेड उत्तर

एमआयएमची दुसरी यादी

शंकर भगवान सलगर, सांगोला, सोलापूर
फारुक मकबूल शब्दी, सोलापूर मध्य
सुफिया तौफिक शेख, सोलापूर दक्षिण
हिना शफिक मोमीन, कॅन्टोनमेंट, पुणे

एमआयएमची तिसरी यादी

रत्नागर ज्ञानू डावरे, कुर्ला
मोहम्मद सालिम कुरेशी, वांद्रे पूर्व
शाहवाज सर्फराज हुस्सैन शेख, अणुशक्तीनगर
वारिस पठाण, भायखळा
आरिफ मौनुद्दीन शेख, अंधेरी पूर्व

एमआयएमची चौथी यादी

इकबाल अहमद खान, जालना
विवेक देविदास ठाकरे, रावेर, जळगाव
मोहम्मद युसूफ अब्दुल हमीद मुल्ला, धुळे