AIMIM candidates fourth list : एमआयएमची चौथी यादी जाहीर

यापूर्वी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी स्वतः ट्वीट करत तिसरी यादी जाहीर केली होती. याआधी एमआयएमने पुणे कॅन्टोनमेंट, सांगली, सोलापूर मध्य आणि दक्षिण या 4 मतदारसंघासाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली होती.

AIMIM candidates fourth list : एमआयएमची चौथी यादी जाहीर

मुंबई : एमआयएमने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी चौथी यादी (AIMIM candidates fourth list) जाहीर केली. या यादीत जालना, रावेर (जळगाव) आणि धुळे या तीन जागांसाठी उमेदवार जाहीर (AIMIM candidates fourth list) करण्यात आले आहेत. यापूर्वी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी स्वतः ट्वीट करत तिसरी यादी जाहीर केली होती. याआधी एमआयएमने पुणे कॅन्टोनमेंट, सांगली, सोलापूर मध्य आणि दक्षिण या 4 मतदारसंघासाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली होती.

एमआयएमच्या चौथ्या यादीत जालन्यातून इकबाल अहमद खान, रावेरमधून विवेक देविदास ठाकरे आणि धुळ्यातून मोहम्मद युसूफ अब्दुल हमीद मुल्ला यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

एमआयएमची पहिली यादी

 • डॅनियल रमेश लांडगे, वडगाव शेरी, पुणे
 • मुफ्ती मोहम्मद इस्माईल खलिक, मालेगाव मध्य
 • मोहम्मद फिरोज खान, नांदेड उत्तर

एमआयएमची दुसरी यादी

 • शंकर भगवान सलगर, सांगोला, सोलापूर
 • फारुक मकबूल शब्दी, सोलापूर मध्य
 • सुफिया तौफिक शेख, सोलापूर दक्षिण
 • हिना शफिक मोमीन, कॅन्टोनमेंट, पुणे

एमआयएमची तिसरी यादी

 • रत्नागर ज्ञानू डावरे, कुर्ला
 • मोहम्मद सालिम कुरेशी, वांद्रे पूर्व
 • शाहवाज सर्फराज हुस्सैन शेख, अणुशक्तीनगर
 • वारिस पठाण, भायखळा
 • आरिफ मौनुद्दीन शेख, अंधेरी पूर्व

एमआयएमची चौथी यादी

 • इकबाल अहमद खान, जालना
 • विवेक देविदास ठाकरे, रावेर, जळगाव
 • मोहम्मद युसूफ अब्दुल हमीद मुल्ला, धुळे

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *