ओवेसींकडून एमआयएमच्या उमेदवारांची घोषणा, पाच जागांवर नावं जाहीर

ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुसलमीन (AIMIM Maharashtra Vidhansabha Candidate List) पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील आपल्या 5 उमेदवारांची यादी जाहीर केली.

ओवेसींकडून एमआयएमच्या उमेदवारांची घोषणा, पाच जागांवर नावं जाहीर

मुंबई : ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुसलमीन (AIMIM Vidhansabha Candidate List) पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील आपल्या 5 उमेदवारांची यादी जाहीर केली. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी स्वतः ट्विट करत या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. याआधी एमआयएमने पुणे कँटोनमेंट, सांगोला, सोलापूर मध्य आणि दक्षिण या 4 मतदारसंघासाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली होती. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी (VBA) आणि एमआयएमच्या युतीची शक्यता आणखी धुसर झाल्याचं बोललं जात आहे.

ओवेसी यांनी ट्विट करत कुर्ला, वांद्रे पूर्व, अणुशक्तीनगर, भायखळा आणि अंधेरी (पश्चिम) विधानसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांची घोषणा केली. त्यानुसार कुर्ल्यातून रत्नाकर ज्ञानू डावरे, वांद्रे पूर्वमधून मोहम्मद सलिम कुरेशी, अणुशक्तीनगरमधून शाहनवाज सरफराज शेख, भायखळामधून वारिस पठाण आणि अंधेरी (पश्चिम) येथून आरिफ मोईनुद्दीन शेख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


याआधी सोलापुरातील सांगोला मतदारसंघातून एमआयएमने अॅड. शंकर भगवान सरगर, सोलापूर मध्य मधून फारुक मकबूल शब्दी, सोलापूर दक्षिण मधून सुफिया तौफिक शेख, तर पुणे कँटोनमेंट मधून हीना शफिक मोमीन यांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Assembly Poll Dates) निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी सोमवार 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे, तर गुरुवार 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा

निवडणुकांच्या तारखा (Maharashtra Assembly Election Announcement) जाहीर केल्या आहेत. यासोबतच दोन्ही राज्यांत आदर्श आचारसंहिता 21 सप्टेंबरपासूनच लागू झाली आहे.

महाराष्ट्रातील 288 जागांसाठी एकाच टप्प्यात 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर धनत्रयोदशीच्या आदल्याच दिवशी म्हणजे 24 ऑक्टोबरला निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *