राधाकृष्ण विखेंविरोधात थोरल्या भावाकडून आमरण उपोषणाचा इशारा  

| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

पुणे : काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. यावेळी कुणा विरोधी नेत्यांनी राधाकृष्ण विखे पाटलांसमोर आव्हान उभं केलं नाही, तर त्यांच्याच सख्ख्या थोरल्या भावाने म्हणजे अशोक विखे पाटलांनीच राधाकृष्ण विखे पाटलांविरोधात दंड थोपटले आहेत. अशोक विखे पाटलांनी धाकट्या भावाविरोधात अर्थात राधाकृष्ण विखे पाटलांच्या विरोधात आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. येत्या 7 […]

राधाकृष्ण विखेंविरोधात थोरल्या भावाकडून आमरण उपोषणाचा इशारा  
Follow us on

पुणे : काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. यावेळी कुणा विरोधी नेत्यांनी राधाकृष्ण विखे पाटलांसमोर आव्हान उभं केलं नाही, तर त्यांच्याच सख्ख्या थोरल्या भावाने म्हणजे अशोक विखे पाटलांनीच राधाकृष्ण विखे पाटलांविरोधात दंड थोपटले आहेत. अशोक विखे पाटलांनी धाकट्या भावाविरोधात अर्थात राधाकृष्ण विखे पाटलांच्या विरोधात आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

येत्या 7 दिवसात आपल्या मागण्यांवर निर्णय घेतला नाही किंवा कुठलीच कारवाई केली नाही, तर  येत्या 20 तारखेपासून लोणीच्या पद्मश्री विखे पाटील यांच्या पुतळ्यासमोर बसून उपोषणाला बसेन, असा इशारा अशोक विखे पाटील यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे मुख्य सचिव, नगरचे पोलिस अधीक्षक आणि नगरचे जिल्हाधिकारी यांना अशोक विखे पाटील यांनी पत्र पाठवून उपोषणाचा इशारा दिला आहे.

अशोक विखे पाटलांच्या मागण्या काय?

  • राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ताब्यात असणाऱ्या कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत, ते तातडीने द्यावेत.
  • प्रवरा मेडिकल ट्रस्टला झाकीर नाईक यांच्या संस्थेकडून जो पैसा मिळाला त्याची चौकशी झाली पाहिजे.
  • नगर जिल्हा परिषदमार्फत ज्या जागा भरण्यात आल्या होत्या, त्या कशा पद्धतीने भरण्यात आल्यात त्याची चौकशी करण्यात यावी.
  • 2004 ते 2009 या काळात नगर जिल्हा परिषदेकडून राबवण्यात आलेल्या मध्यान्न योजनेची चौकशी व्हावी.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात संग्राम जगताप यांना पूरक वातावरण होते, असेही यावेळी अशोक विखे पाटील म्हणाले. शिवाय, “विधानसभा निवडणूक लढवण्याचा माझा अजून विचार नाही, मात्र अशा तत्वांच्या विरोधात लढाईला मला उतरावे लागेल”, असं सूचक वक्तव्य यावेळी अशोक विखे पाटील यांनी केले.