Maharashtra Assembly Speaker : विधानसभा अध्यक्षपदसाठी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची चर्चा, वाचा सविस्तर…

| Updated on: Jul 01, 2022 | 11:24 AM

Radhakrishna Vikhe Patil : विधानसभा अध्यक्षपद राधाकृष्ण विखे पाटलांकडे?

Maharashtra Assembly Speaker : विधानसभा अध्यक्षपदसाठी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची चर्चा, वाचा सविस्तर...
Follow us on

मुंबई : सध्या राज्यात नवं शिंदे सरकार अस्तित्वात आलं आहे. या सरकारच्या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार, कुणाला कुठलं खातं दिलं जाणार याची चर्चा होत असतानाच आता विधानसभा अध्यक्षपदसाठी एका एका नव्या नावाची चर्चा होत आहे. त्यातच आता भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या नावाची चर्चा विधानसभा अध्यक्षपदासाठी चर्चा होत आहे. 2019 च्या निवडणुकीआधी काँग्रेसच्या त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजसोबत हात मिळवणी केली. पण 2019 ला सत्तेची गणित पूर्णपणे बदलली. मविआ सरकार सत्तेत आलं अन् काँग्रेस, राष्ट्रवादी सोडत भाजपमध्ये सामील झालेल्या अनेकांचा स्वप्नभंग झाला. त्यात विखे पाटीलदेखील होते पण आता भाजप पुन्हा सत्तेत आलेलं असताना विखे पाटलांना संधी मिळणा असल्याचं बोललं जात आहे.

विधानसभा अध्यक्षपद विखेंकडे?

विधानसभा अध्यक्षपदसाठी एका एका नव्या नावाची चर्चा होत आहे. त्यातच आता भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची चर्चा विधानसभा अध्यक्षपदासाठी चर्चा होत आहे. विखेंकडे हे पद जाण्याची दाट शक्यता आहे. विखे पाटील नेमके कोण आहेत? जाणून घेऊयात..

बालपण, सामाजिक कार्याला सुरुवात

राधाकृष्ण विखे-पाटील यांचा जन्म 15 जून 1959 मध्ये झाला. सामाजिक, राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घराण्यात जन्मलेल्या राधाकृष्ण विखे यांना लहानपणापासूनच समाजकारणाचं बाळकडू मिळालं होतं. त्यांचे आजोबा विठ्ठलराव विखे-पाटील यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे राज्यातील पहिले पब्लिक स्कूल प्रवरानगरला सुरू केले. याच पब्लिक स्कूलमध्ये राधाकृष्ण विखे यांना पहिलीत प्रवेश देण्यात आला. आजोबांच्या आग्रहाखातरच त्यांना वसतिगृहात घालण्यात आलं. तिथूनच राधाकृष्ण विखे त्यांच्यात सामाजिक जाणीव निर्माण झाली. या पब्लिक स्कूलमध्ये त्यांनी इयत्ता अकरावीपर्यंतचे शिक्षण घेतले. अकरावीनंतर धुळे, कोल्हापूर कृषी विद्यापीठात शिक्षण घेत असताना ते सामाजिक कार्याकडे ओढले गेले. कोल्हापुरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी संपही केला होता. विखे घराण्याने नगरमध्ये सहकार क्षेत्रात मोठं योगदान दिलं आहे. आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना नगरमध्ये सुरू केला. त्यांचे आजोबा विठ्ठलराव विखे पाटील यांनी सुरू केला. सहकार, समाजकारण आणि राजकारणात विखे-पाटील घराण्याचं मोठं योगदान आहे.

हे सुद्धा वाचा

काँग्रेसमधून राजकीय प्रवास

राधाकृष्ण विखेपाटील यांनी काँग्रेसमधून राजकारणास सुरुवात केली. 1986मध्ये ते युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. या काळात त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले. भारत निर्माण अभियानांतर्गत भंडारदरा ते जामखेड अशी पायी दिंडी काढली.

पहिली निवडणूक

विखे यांच्या राजकारणाची सुरुवात खऱ्या अर्थाने 90च्या दशकात सुरू झाली. त्यांनी 1994मध्ये शिर्डी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. आजही या मतदारसंघाचे ते निर्विवादपणे प्रतिनिधीत्व करत आहेत.

आणि काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली

राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील तत्कालीन खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला. वडिलांपाठोपाठ राधाकृष्ण विखे यांनीही आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत ते शिर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते.