ये बंदा लै जोरात, बाळासाहेब थोरात… सेना-भाजपनंतर अवधूत गुप्तेंचं काँग्रेससाठी प्रचारगीत

| Updated on: Oct 18, 2019 | 12:30 PM

शिवसेना आणि भाजप यांच्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासाठी अवधूत गुप्तेंनी प्रचारगीत तयार केलं आहे.

ये बंदा लै जोरात, बाळासाहेब थोरात... सेना-भाजपनंतर अवधूत गुप्तेंचं काँग्रेससाठी प्रचारगीत
Follow us on

मुंबई : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जर सर्वाधिक आवाज कोणाचा घुमला असेल, तर तो आहे संगीतकार-गायक अवधूत गुप्ते यांचा. कारण शिवसेना आणि भाजप यांच्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासाठी अवधूत गुप्तेंनी प्रचारगीत (Avadhoot Gupte Congress Campaign song) तयार केलं आहे.

एका बाजूला नाशिक-शिर्डी
एका बाजूला पुणे-नगर
जणू पाचूच्या कोंदणामंदी
कोणी हिरा जडावा सुंदर
एक गाव आहे टपोरं
त्याचं नाव.. संगमनेर

अवधूत गुप्ते यांनी गायलेल्या प्रचारगीतात सुरुवातीला बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघाचं वर्णन करण्यात आलं आहे (Avadhoot Gupte Congress Campaign song).

संगमनेरच्या विकासामागे कारण आहे जो ‘हात’
संगमनेरची जनताच म्हणते इस बंदे मे है कुछ बात
ये बंदा लै जोरात, बाळासाहेब थोरात

अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर स्तुतिसुमनं उधळण्यात आली आहेत. थोरातांविरोधात शिवसेनेने साहेबराव नवले यांना तिकीट दिलं आहे.

अवधूत गुप्ते यांनी महायुतीतील दोन्ही पक्षांसोबतच आघाडीसाठीही प्रचारगीत गायलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांसाठी गाणं गाताना फरक असावा लागतो, असं अवधूत गुप्तेंनी भाजपच्या प्रचारगीताच्या अनावरणावेळी (Avadhoot Gupte Congress Campaign song) सांगितलं होतं.

सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील फरक लक्षात घ्यावा लागतो. सत्ताधाऱ्यांचं गीत गाताना सॉफ्ट आवाजात गावं लागतं. तर विरोधकांचं गीत गाताना वरच्या पट्टीत गावं लागतं. पक्षाने केलेली कामगिरी लक्षात घेऊन गीत गावं लागतं. सर्व गोष्टी सांभाळणं मोठी कसरत असते’ असं अवधूत गुप्ते यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना सांगितलं.

‘महायुतीचा एकच निर्धार, पुन्हा आणूया आपलं सरकार’
पुन्हा आणूया महायुती सरकार,
पुन्हा आणूया देवेंद्र सरकार,
पुन्हा आणूया भाजप सरकार’ असे भाजपच्या प्रचारगीताचे शब्द होते.

शिवसेनेच्या प्रचारगीताची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून होते. पुढे भगवा झेंडा आणि शिवसैनिकांच्या जल्लोषाचे अनेक क्षण यात दाखवण्यात आले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनाही या प्रचारगीतात प्रामुख्याने दाखवलं आहे. आदित्य ठाकरेंच्या लाँचिंगसाठीच हे गाणं आणल्याचीही चर्चा आहे.

संबंधित बातम्या :

शिवसेनेनंतर भाजपचं प्रचारगीतही अवधूत गुप्तेंच्या आवाजात

शिवसेनेचं नवं प्रचारगीत आंध्रची नक्कल? प्रशांत किशोर समान दुवा