Sanjay Shirsat | शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ही तुमची प्रॉपर्टी नाही, हे शिवसैनिकाचं दैवत आहे, आमदार संजय शिरसाट यांचा इशारा

| Updated on: Jul 26, 2022 | 10:20 AM

'सामना' चे संपादक खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची दीर्घ मुलाखत घेतली आहे. त्या मुलाखतीचा काही अंश जारी झाला असून यात उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांना इशारा दिला आहे.

Sanjay Shirsat | शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ही तुमची प्रॉपर्टी नाही, हे शिवसैनिकाचं दैवत आहे, आमदार संजय शिरसाट यांचा इशारा
संजय शिरसाट, आमदार, औरंगाबाद
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) ही तुमची प्रॉपर्टी नाही. ते प्रत्येक शिवसैनिकांचं (Shivsainik) दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकरांनंतर बाळासाहेब ठाकरेंचं (Uddhav Thackeray) नाव सभेत घेतलं जातं. त्या उंचीच्या नेत्याला एवढं खुजं करू नका, असा इशारा आमदार संजय शिरसाट यांनी दिला आहे. ‘सामना’ चे संपादक खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची दीर्घ मुलाखत घेतली आहे. त्या मुलाखतीचा काही अंश जारी झाला असून यात उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांना इशारा दिला आहे. शिवसेनेचा बाप, बाळासाहेब ठाकरेंच्या नावाशिवाय निवडून येण्याचं आव्हान दिलं आहे. तसेच शिवसेनेतून गेलेल्यांना पालापाचोळा असा शब्दोल्लेख केला आहे. याला औरंगाबादचे शिंदे गटात गेलेले आमदार संजय शिरसाट यांनी सडेतोड उत्तर दिलंय.

‘शिवसेनाप्रमुखांना खुजं करू नका… ‘

उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देताना संजय शिरसाट म्हणाले, ‘ शिवसेना प्रमुखांची उंची तुम्ही कमी करू नका. त्यांच्या पुण्याईमुळे आम्ही घडलोत. त्यांना तुम्ही एवढं छोटं कमी करण्याचा का प्रयत्न करताय? राजकारण करायचं तर स्वतःचा ठसा उमटवा. आजही पहिलं नाव छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर आणि नंतर बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेता. त्या दर्जात उच्च पदाला गेलेला हा माणूस आहे. त्याला खाली खेचायचं काम करू नका. शिवसेना प्रमुख ही तुमची प्रॉपर्टी नाही, ती प्रत्येक शिवसैनिकाचं दैवत आहे. त्यांचा उल्लेख पुन्हा असा करू नका. त्यांना खुजं करू नका..

पालापाचोळा कुणाला म्हणतायत?

शिवसेनेतून बाहेर गेलेल्यांना पानं गळाली, पालापाचोळा असा उल्लेख उद्धव ठाकरेंनी मुलाखतीतून केलाय. यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, ‘ पानं गळालीत त्यांचा अपमान करू नका. आज आम्हीही पाहत आहोत. मनोहर जोशी, लीलाधर ढाके तुमच्याबरोबर बसलेले दिसत नाहीत. हे काळाबरोबर बदलत जातं. नव्यांचं स्वागत करा, पण आपल्या घरातल्यांना विसरू नका. हे विसरले तर तुम्ही शिवसैनिकांना पाला पाचोळा म्हणू नका.. सरपोतदार, लीलाधर ढाके हे काय पाचोळा होते, मनोहर जोशी आजही आहेत. या मोठ्यांच्या सावलीत तर आम्ही वाढलो या नेत्यांनी एकेका गावात-खेड्यात जाऊन शिवसेना रुजवायचं काम केलं. त्याला पाला पाचोळा म्हणता येणार नाही. माझ्यासारख्या 38 वर्षे घालवली. उद्या तुम्हाला कुणी पालापाचोळा म्हटलं तर काय होईल?

‘आजारी असताना बंड म्हणाले हे साफ खोटं..’

मी आजारी असताना एकनाथ शिंदेंनी बंड केल्याचा आरोप या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी केलाय. मात्र हा आरोप शिरसाटांनी फेटाळून लावला. ते म्हणाले, ‘
सत्तेत जाण्यासाठी शिंदे साहेबांनी हा उठाव केला नव्हता. त्यांच्याकडे नगरविकास सारखं महत्त्वाचं खातं आहे. मी आजारी असताना घडलेला असताना हा प्रकार केल्याचं उद्धव ठाकरे सांगत आहेत. हे खोटं आहे. आम्ही त्यांच्या प्रकृतीसाठी अभिषेक केला. ही दोन वर्षांपासूनची प्रक्रिया आहे. ते बरे झाल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस आम्हाला नको आहेत, असं आम्ही म्हटलं. पण आजही मुलाखतीतून त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाच मोठं म्हटलंय, याचं वाईट वाटतं…..