Baramati, Rahuri By-Election Final Results 2026: सुनेत्रा पवारांचा 2 लाख 18 हजार 930 मतांनी विजय
Baramati, Rahuri By-Election Final Results 2026: बारामती आणि राहुरी या दोन्ही ठिकाणी मत मोजणीला सुरुवात झाली आहे. काही वेळातच येथील चित्र स्पष्ट होईल.

Baramati, Rahuri By-Election Results 2026 LIVE: पुणे जिल्ह्यातील बारामती आणि अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी पार पडत आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत आणि भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक होत आहे. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार निवडणुक लढवत आहेत तर शिवाजी कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डिले निवडणुकीच्या रिंगणात आहे. मत मोजणीला सुरुवात झाली आहे. काही वेळातच दोन्ही ठिकाणचे चित्र स्पष्ट होईल.
LIVE NEWS & UPDATES
-
पश्चिम बंगालमधल्या विजयाबद्दल भाजपाचे अभिनंदन – जयंत पाटील
पश्चिम बंगाल मध्ये भाजपाने प्रचंड मेहनत घेऊन विजय मिळवला आहे,या विजयाबद्दल त्यांचे प्रथमदर्शनी अभिनंदन केले पाहिजे,अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी दिली आहे, विजयानंतर या गोष्टीचा विश्लेषण होईल, विवेचन होईल त्यानंतर त्याच्यावर अधिक बोलता येईल,असे देखील ते म्हणाले आहे.
-
Baramati, Rahuri By-Election Final Results 2026: सुनेत्रा पवार विजय, तब्बल 2 लाख 18 हजार 930 मतांनी यश
बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा विजय झाला आहे. त्यांनी 2 लाख 18 हजार 930 मतांनी विजय मिळवला आहे.
-
-
Baramati, Rahuri By-Election Results 2026 LIVE: राहुरी पोटनिवडणुकीत भाजपच्या अक्षय कर्डिलेंचा विजय
राहुरीमध्ये भाजपचे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले रिंगणात उतरले होते. आता भाजपच्या अक्षय कर्डिलेंचा विजय झाला आहे.
-
Baramati, Rahuri By-Election Results 2026 LIVE: सुनेत्रा पवारांची मोठी बाजी! दोन लाखांचा टप्पा पार
सुनेत्रा पवार यांचा मतांचा विक्रम. २२ व्या फेरी अखेर सुनेत्रा पवार २,०३,००३ मताधिक्यांनी आघाडीवर
अजून दोन फेऱ्या बाकी..
इतरांना गेलेली एकूण मते – ४३८१
-
Baramati, Rahuri By-Election Results 2026 LIVE: शरद पवार गटाला मोठा झटका, अक्षय कर्डीले 86253 मतांनी आघाडीवर
22व्या फेरी अखेर मिळालेली मते
भाजप अक्षय कर्डिले – 109712
राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 23459
वंचित संतोष चोळके- 5134
अपक्ष रावसाहेब खेवरे- 7148
22 व्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 86253 मतांनी आघाडीवर
-
West Bengal Election Results 2026 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या मोठा निर्णय,..
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या मोठा निर्णय घेतला. पोलिसांनी मिरवणूक काढण्यास मनाई केलीये.
-
Baramati, Rahuri By-Election Results 2026 LIVE: सुनेत्रा पवारांनी मोडला अजितदादांचा तो रेकॉर्ड
बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांना मिळालेली मते पाहून अजित पवारांचा सर्वाधिक मताधिक्याचा रेकॉर्ड मोडला असल्याचे चित्र आहे. अजित पवारांनी भाजपच्या गोपीचंद पडळकर यांना धूळ चारत १ लाख ६५ हजार मतांनी विजय मिळवला होता. हा राज्यातील सर्वात मोठा रेकॉर्ड होता. पण आता १९ व्या फेरीत सुनेत्रा पवार 168555 मतांनी आघाडीवर आहेत. त्या ज्यातील सर्वाधिक मताधिक्य मिळवणाऱ्या उमेदवार ठरल्या आहेत.
-
Baramati, Rahuri By-Election Results 2026 LIVE: शरद पवार गटाला दणका, अक्षय कर्डिले 94984 मतांनी आघाडीवर
राहुरी पोटनिवडणुकीच्या 19व्या फेरीचे आकडे समोर आले आहेत.
भाजप अक्षय कर्डिले – 94984
राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 20915
वंचित संतोष चोळके- 5029
अपक्ष रावसाहेब खेवरे- 7065
19व्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 74069 मतांनी आघाडीवर
-
Baramati, Rahuri By-Election Results 2026 LIVE: आठराव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 72836 मतांनी आघाडीवर
आठराव्या फेरी अखेर मिळालेली मते
भाजप अक्षय कर्डिले – 90638
राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 17802
वंचित संतोष चोळके- 4953
अपक्ष रावसाहेब खेवरे- 7038
आठराव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 72836 मतांनी आघाडीवर
-
Baramati, Rahuri By-Election Results 2026 LIVE: राहुरीत मतमोजणी केंद्राबाहेर BJP कार्यकर्त्यांचा विजयी जल्लोष
अक्षय कर्डिले यांच्या विजयाची केवळ औपचारिकता बाकी. आतापर्यंतच्या सर्व फेऱ्यांमध्ये निर्णायक आघाडी असल्याचे पाहायला मिळते. मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांडून विजयी जल्लोष पाहायला मिळत आहे. आजचा विजय हा दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांना ख-या अर्थाने श्रद्धांजली असल्याचे बोलले जात आहे.
-
Baramati, Rahuri By-Election Results 2026 LIVE: चौदाव्या फेरीतही अक्षय कर्डिले आघाडीवर
चौदाव्या फेरी अखेर मिळालेली मते
भाजप अक्षय कर्डिले – 70831
राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 12634
वंचित संतोष चोळके- 4670
अपक्ष रावसाहेब खेवरे- 6433
चौदाव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 58197 मतांनी आघाडीवर
-
Baramati, Rahuri By-Election Results 2026 LIVE: मोठी बातमी! सुनेत्रा पवारांचा विजय निश्चित
बाराव्या फेरीनंतर सुनेत्रा पवार यांनी १ लाख ३ हजार ७०९ मतांची आघाडी घेतली आहे. बाराव्या फेरीत सुनेत्रा पवार यांना ८०५७ मतं मिळाली आहेत. एकूण २३ फेऱ्यांपैकी १२ फेऱ्यांचे निकाल समोर आले आहेत. बाराव्या फेरीनंतर सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित असल्याचे चित्र दिसत आहेत.
-
Baramati, Rahuri By-Election Results 2026 LIVE: राहुरीतून अक्षय कर्डिले 54 हजार 337 मतांनी आघाडीवर
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत 13 व्या फेरीतील आकडेवारी पाहाता भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले हे विजयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र आहे.
तेराव्या फेरी अखेर मिळालेली मते
भाजप अक्षय कर्डिले – 61107
राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 11770
वंचित संतोष चोळके- 4545
अपक्ष रावसाहेब खेवरे- 6179तेराव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 54337 मतांनी आघाडीवर
-
Baramati, Rahuri By-Election Results 2026 LIVE: भाजपचे अक्षय कर्डिले 61035 मतांनी आघाडीवर
भाजप अक्षय कर्डिले – 61035
राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 10762
वंचित संतोष चोळके- 4234
अपक्ष रावसाहेब खेवरे- 5896
बाराव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 50273 मतांनी आघाडीवर
-
Baramati, Rahuri By-Election Results 2026 LIVE: शरद पवार गटाला धक्का, अक्षय कर्डिले 55767 मतांनी आघाडीवर
अकराव्या फेरी अखेर मिळालेली मते
भाजप अक्षय कर्डिले – 55767
राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 9362
वंचित संतोष चोळके- 4150
अपक्ष रावसाहेब खेवरे- 5601
अकराव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 46405 मतांनी आघाडीवर
-
Baramati, Rahuri By-Election Results 2026 LIVE: अभिजीत बिचुकलेला नोटा पेक्षा कमी मतदान, करुणा मुंडेंला किती मते?
सहाव्या फेरीअखेरचे आकडे पाहता, सुनेत्रा पवार यांना तब्बल 53,478 मते मिळाली. त्यांच्या पुढे इतर उमेदवार हे मागे असल्याचे चित्र आहे.
अभिजीत बिचुकले यांना 65 मते,
करुणा मुंडे यांना 68 मते,
तर चंद्रकांत वाघमोडे यांना 30 मते मिळाली आहेत.
याशिवाय नोटाला 153 मते.
एकूण 54,490 मतांची मोजणी पूर्ण झाली आहे.
-
Baramati, Rahuri By-Election Results 2026 LIVE: सुनेत्रा पवार सुसाट, 87728 मतांची आघाडी
१० व्या फेरी अखेर
एकूण झालेले मतदन – ९४७७
सुनेत्रा पवारांना झालेलं मतदान – ९२००
इतर मते – २७७
१० व्या फेरी अखेर सुनेत्रा पवारांना झालेले एकूण मतदान – ८७७२८
इतरांना गेलेली एकूण मते – १७०२
-
Baramati, Rahuri By-Election Results 2026 LIVE: राहुरीत शरद पवार गटाला दणका, अक्षय कर्डिले 49956 मतांनी आघाडीवर
दहाव्या फेरी अखेर मिळालेली मते
भाजप अक्षय कर्डिले – 49956
राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 8469
वंचित संतोष चोळके- 3707
अपक्ष रावसाहेब खेवरे- 4516
दहाव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 41487 मतांनी आघाडीवर असल्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
-
Baramati, Rahuri By-Election Results 2026 LIVE: अक्षय कर्डिलेंची गाडी सुसाट, दहाव्या फेरीतही आघाडीवर
राहुरी विधानसभा पोटनिवडणूक –
दहाव्या फेरी अखेर मिळालेली मते
भाजप अक्षय कर्डिले – 49956
राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 8469
वंचित संतोष चोळके- 3707
अपक्ष रावसाहेब खेवरे- 4516
दहाव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 41487 मतांनी आघाडीवर
-
Baramati, Rahuri By-Election Results 2026 LIVE: आठव्या फेरीत अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 33222 मतांनी आघाडीवर
राहुरी विधानसभा पोटनिवडणूक –
आठवी फेरी अखेर मिळालेली मते
भाजप अक्षय कर्डिले – 39645
राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे – 6423
भाजपचे अक्षय कर्डिले 39645 मतांनी आघाडीवर असल्याचे चित्र
-
West Bengal Election Results 2026 : पश्चिम बंगालमध्ये मोठा झटका भाजपाला..
पश्चिम बंगालमध्ये भाजपा विजयाच्या अत्यंत जवळ आहे. मात्र, ममता बनर्जी भवानीपूरमध्ये पुढे आहेत. भाजपाचा पश्चिम बंगालमधील मोठा चेहरा असलेले अधिकारी पिछाडीवर आहेत.
-
Baramati, Rahuri By-Election Results 2026 LIVE: सातव्या फेरीत अक्षय कर्डिले सुसाट
भाजप अक्षय कर्डिले – 35076
राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे – 5401
वंचित संतोष चोळके- 2859
अपक्ष रावसाहेब खेवरे- 2343
सातव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 29657 मतांनी आघाडीवर
-
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा कब्जा, ममता बनर्जींना पळता भुई कमी..
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल पुढे येत आहेत. ममता बनर्जी यांना या निवडणुकीत दणका बसल्याचे बघायला मिळत आहे. टीएमसी निवडणुकीत पिछाडीवर आहे.
-
Baramati, Rahuri By-Election Results 2026 LIVE: सुनेत्रा पवार यांना 97 टक्के मते मिळतील- रोहित पवार
उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांना 97 टक्के मते मिळतील. मतदाना दिवशी आणखी दहा टक्के मतदान झाले असते तर सुनेत्रा काकींनी देशातील सर्वाधिक मताधिक्याचे आजवरचे सर्व विक्रम मोडले असते असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.
-
Baramati, Rahuri By-Election Results 2026 LIVE: पाचव्या फेरीत अक्षय कर्डिले विजयाच्या दिशेनं
पाचव्या फेरी अखेर मिळालेली मते
भाजप अक्षय कर्डिले – 25408
राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 3522
वंचित संतोष चोळके- 1438
अपक्ष रावसाहेब खेवरे- 1603
-
Baramati, Rahuri By-Election Results 2026 LIVE: पोटनिवडणुकीच्या निकालापूर्वी सुनेत्रा पवार यांची पोस्ट, नेमकं काय म्हणाल्या?
बारामती विधानसभा पोटनिवडणूकीचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. मतमोजणी सुरु असतानाच सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. “आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास मी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते. आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत. दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया.”
पुढे त्या म्हणाल्या, “दादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याची संधी मला दिल्याबद्दल मी सर्व बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार मानते. हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे. निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची!”
-
Baramati, Rahuri By-Election Results 2026 LIVE: राहुरीमध्ये अक्षय कर्डीले 18123 मतांनी आघाडीवर
राहुरी विधानसभा पोटनिवडणूकीत चौथ्या फेरीत अक्षय कर्डीले आघाडीवर असल्याचे चित्र आहे
भाजप अक्षय कर्डिले – 20849
राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 2726
वंचित संतोष चोळके- 1174
अपक्ष रावसाहेब खेवरे- 1230
-
Baramati, Rahuri By-Election Results 2026 LIVE: चौथ्या फेरीतही सुनेत्रा पवार आघाडीवर, 36591 मिळाली
बारामती विधानसभा पोटनिवडणूकीच्या चौथ्या फेरीतही सुनेत्रा पवार या आघाडीवर असल्याचे चित्र आहे. त्यांना 36591 मिळाली असून त्यांची गाडी सुसाट असल्याचे चित्र आहे.
-
Baramati, Rahuri By-Election Results 2026 LIVE: तिसऱ्या फेरीतच विरोधकांचा सुपडा साफ
बारामती विधानसभा पोटनिवडणूकत सुनेत्रा पवार 26773 मतांनी आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. तर राहुरीमध्ये भाजपचे अक्षय कर्डिले 16852 मतांनी आघाडीवर आहेत.
-
Baramati, Rahuri By-Election Results 2026 LIVE: दुसऱ्या फेरीतही सुनेत्रा पवार आघाडीवर 16543 मते
दुसऱ्या फेरी अखेर सुनेत्रा पवार यांना 16543 मते मिळाली आहेत. त्या आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. अक्षय कर्डीले यांना 11071 मिळाले आहेत. तर गोविंद मोकाटे राष्ट्रवादी शरद पवार गट यांना 1434 मते मिळाली आहेत. दुसऱ्या फेरीत अक्षय कार्डीले पिछाडीवर असल्याचे चित्र आहे.
-
Baramati, Rahuri By-Election Results 2026 LIVE: पहिल्या फेरीतच सुनेत्रा पवारांची गाडी सुसाट
बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी पहिल्याच फेरीत आघाडी घेतली. सुनेत्रा पवारांनी ६५०० मतांची आघाडी घेतली आहे. तर राहुरी पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार अक्षय कर्डीले हे 460 मतांनी आघाडीवर आहेत.