भाजप प्रवेशानंतर सनी देओलचा पहिलाच रोड शो, चाहत्यांची तुफान गर्दी

बारमेर, राजस्थान : भाजपात प्रवेश केल्यानंतर अभिनेता सनी देओलच्या रोड शोचं पहिल्यांदाच आयोजन करण्यात आलं होतं. राजस्थानमधील बारमेरचे भाजप उमेदवार कैलाश चौधरी यांच्या प्रचारात त्याने सहभाग घेतला. या रोड शोसाठी तुफान गर्दी जमली होती, सनी देओलला चाहत्यांकडून वेगवेगळ्या भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी त्याच्या सिनेमांमध्ये गाजलेले काही प्रसिद्ध डायलॉगही लावण्यात आले. गदर सिनेमातील ‘हिंदुस्तान झिंदाबाद था, […]

भाजप प्रवेशानंतर सनी देओलचा पहिलाच रोड शो, चाहत्यांची तुफान गर्दी
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:57 PM

बारमेर, राजस्थान : भाजपात प्रवेश केल्यानंतर अभिनेता सनी देओलच्या रोड शोचं पहिल्यांदाच आयोजन करण्यात आलं होतं. राजस्थानमधील बारमेरचे भाजप उमेदवार कैलाश चौधरी यांच्या प्रचारात त्याने सहभाग घेतला. या रोड शोसाठी तुफान गर्दी जमली होती, सनी देओलला चाहत्यांकडून वेगवेगळ्या भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी त्याच्या सिनेमांमध्ये गाजलेले काही प्रसिद्ध डायलॉगही लावण्यात आले.

गदर सिनेमातील ‘हिंदुस्तान झिंदाबाद था, झिंदाबाद है, झिंदाबाद रहेगा’ हा डायलॉगही यावेळी लावण्यात आला. शिवाय प्रसिद्ध तारीख पे तारीख हा डायलॉगही चाहत्यांना ऐकवण्यात आला. राजस्थान हे पाकिस्तानला लागून असलेलं सीमावर्ती राज्य आहे. अनेक देशभक्तीपर सिनेमांमधून नायक ठरलेल्या सनी देओलचा राजस्थानमध्येही मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळेच त्याचा राजस्थानमध्ये रोड शो ठेवण्यात आला.

VIDEO : रोड शोचा व्हिडीओ 

सनी देओलने नुकताच भाजपात प्रवेश केलाय. त्याला पंजाबमधील गुरदासपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. हा मतदारसंघ नेहमीच भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. दिवंगत अभिनेते विनोद खन्ना इथून खासदार होते. पण त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत इथून काँग्रेसने विजय मिळवला होता. यावेळी भाजपने ही जागा पुन्हा मिळवण्यासाठी सनी देओलला मैदानात उतरवलंय.

VIDEO : गदर सिनेमातील डायलॉग