AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी वादळाची लेक!; पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतीदिनाच्या भाषणाचा ट्रेलर दाखवला

Pankaja Gopinath Munde : सध्याचं राजकारण, एकनाथ खडसे यांचं वक्तव्य अन् गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनाच्या भाषणाची झलक; पाहा काय म्हणाल्या पंकजा मुंडे

मी वादळाची लेक!; पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतीदिनाच्या भाषणाचा ट्रेलर दाखवला
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jun 03, 2023 | 1:12 PM
Share

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी काही वेळा आधी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. आज भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा स्मृतीदिन आहे. यावर पंकजा मुंडे बोलल्या आहेत. गोपीनाथ मुंडे यांचं वादळी जीवन राहिलं आहे. मी वादळाची लेक आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.  पंकजा मुंडे यांनी काही वेळाआधी गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केलं.

भाषणात नक्की काय बोलणार?

पंकजा मुंडे आज तीन वाजता भाषण करणार आहेत. तेव्हा या भाषणात काय बोलणार? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. तेव्हा मलाच माहिती नाही मी नक्की काय बोलणार आहे. माझ्या हातात कधीही कागद नसतो. कधी कोणती चिठ्ठी नसते. माझं भाषण लोकांना संबोधून असतं. त्यामुळे मी जे काही बोलेन ते तीन वाजता लोकांना ऐकायला मिळणार आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

लोक गोपीनाथ मुंडे यांना मानतात. त्यांच्या दर्शनाला येतात. लोकांना त्यांचं दर्शन घेऊन उर्जा मिळत असेल. तर ती चांगली गोष्ट आहे, असं त्या म्हणाल्या आहेत.

सध्याच्या राजकारणावर पंकजा म्हणाल्या…

आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत भावनिक असतो. यादिवशी मला राजकारण वगैरे काहीही दिसत नाही. राजकारण शून्य दिसतं. आज जे लोक आलेत. त्यांना मी काहीही दिलेलं नाही. तरी ते साहेबांवरच्या प्रेमापोटी आलेले आहेत. एकनाथ खडसे आलेत. ते बाबांचे सहकारी होते. तेही त्यांच्यावरील प्रेमापोटी आले आले आहेत, असं पंकजा म्हणाल्यात.

विनोद तावडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता. तावडे आमचे महामंत्री आहेत. ते बोलले असतील तर त्यावर मी काय बोलणार? नाथाभाऊ काय म्हणाले, तावडे काय म्हणाले, याचं उत्तर पंकजा मुंडे काय उत्तर देणार, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडे यांनी आज एक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. माझं भाग्य आहे की माझा जन्म त्यांच्या पोटी झाला. त्याहूनही मला माझं भाग्य वाटतं ते म्हणजे त्यांच्या संघर्षाचा वारसा मला मिळाला. स्वाभिमानाने संघर्ष करत मुंडेसाहेब लढले. तसंच मीदेखील लढत राहील हे मी माझं कर्तव्य समजते. तेमी शेवटच्या श्वासापर्यंत पूर्ण करत राहील, असं पंकजा मुंडे या व्हीडिओमध्ये म्हणाल्या आहे.

Follow Us
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप