Beed Politics : बीडच्या राजकारणात मोठा उलटफेर? विजयसिंह पंडितांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर लागताच, चर्चांना उधाण!

विजयसिंह पंडित यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे काही बॅनर लावण्यात आले आहेत. यातील बॅनरवर शुभेच्छुक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड विधानसभा असा उल्लेख आहे. बीड विधानसभेचे कार्यकर्ते हे विजयसिंह पंडित यांना शुभेच्छा देत असल्याने नेमकं काय घडतंय? असा सवाल केला जातोय.

Beed Politics : बीडच्या राजकारणात मोठा उलटफेर? विजयसिंह पंडितांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर लागताच, चर्चांना उधाण!
vijaysinh pandit and beed georai constituency
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 21, 2026 | 6:27 PM

 अशोक काळकुटे, टीव्ही 9 मराठी, बीड : राज्यात बीड जिल्हा नेहमीच चर्चेत असतो. इथलं राजकारणही चढाओढीचं आहे. लोकसभा आसो किंवा विधानसभा निवडणूक असो, इथली निवडणूक ही चुरशीचीच असते. विशेष म्हणजे या निवडणुका जिंकण्यासाठी या जिल्ह्यातील नेतेमंडळी निवडणुकीआधीच तयारीला लागतात. यात कार्यकर्तेही मागे नाहीत. मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनापासून आमदार विजयसिंह पंडित बीडच्या राजकारणात कायम चर्चेत असतात. आता त्यांच्या वाढदिवसात काही बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरबाजीमुळे बीड शहरात नव्या राजकीय चर्चांना उधाण आलंय.

विजयसिंह पंडित हे बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभेचे आमदार आहेत. ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातील वजनदार नेते आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त बीड शहरात शुभेच्छा देणारे शेकडो बॅनर आणि मोठ-मोठे फ्लेक्स लावण्यात आले आहेत.

Loading...

विजयसिंह पंडित आपला मतदारसंघ बदलणार का?

विजयसिंह पंडित हे गेवराई मतदारसंघातून आमदार आहेत. परंतु बीडमध्ये त्यांचे काही वेगळ्याच अर्थाने बॅनर लागले आहेत. त्यामुळे ते आगामी विधानसभा निवडणुकीत आपला मतदारसंघ बदलणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातोय. ते बीड मतदारसंघातू विधानसभा लढवण्यासाठीची तयारी करत असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगत आहेत. त्यामुळेच सध्या समोर आलेल्या बॅनरला विशेष महत्त्व आले आहे.

बॅनरवर नेमकं काय आहे?

विजयसिंह पंडित यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे काही बॅनर लावण्यात आले आहेत. यातील बॅनरवर शुभेच्छुक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड विधानसभा असा उल्लेख आहे. बीड विधानसभेचे कार्यकर्ते हे विजयसिंह पंडित यांना शुभेच्छा देत असल्याने नेमकं काय घडतंय? असा सवाल केला जातोय.

2024 सालच्या निवडणुकीत काय घडलं होतं?

दरम्यान, विजयसिंह पंडित यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दुष्काळ असल्याने आणि अजित दादांच्या निधनाचे दुःख आजही मनात असल्याने वाढदिवसानिमित्त बॅनर लावू नयेत आणि उत्सवी कार्यक्रम घेऊ नयेत, असे कार्यकर्त्यांना आवाहन केलेले आहे. 2024 सालच्या निवडणुकीत विजयसिंह पंडित यांनी गेवराई मतदारसंघातून शिवसेना (यूबीटी)चे उमेदवार बदामराव लहुराव पंडीत यांचा दारुण पराभव केला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us