रस्त्यावरील नमाजला विरोध, रस्त्यावरील हनुमान चालिसेने उत्तर

| Updated on: Jun 26, 2019 | 4:59 PM

भारतीय जनता युवा मोर्चाचे (BJYM) कार्यकर्ते पुन्हा रस्त्यावर उतरले. या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन हनुमान चालिसा पठण केली.

रस्त्यावरील नमाजला विरोध, रस्त्यावरील हनुमान चालिसेने उत्तर
Follow us on

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील राडेबाजी कायम आहे.  निवडणुकीदरम्यानची जाळपोळ ताजी असताना, भारतीय जनता युवा मोर्चाचे (BJYM) कार्यकर्ते पुन्हा रस्त्यावर उतरले. या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन हनुमान चालिसा पठण केली. भररस्त्यात मोठ्या संख्येने कार्यकर्ते हनुमान चालिसा पठण करु लागल्याने, वाहतुकीत मोठा व्यत्यय आला. राज्य सरकार शुक्रवारी रस्त्यावरील नमाज पठणाला परवानगी देत असेल, तर मंगळवारी हनुमान चाळीसा पठण करण्यात अडचण काय असा सवाल BJYM च्या कार्यकर्त्यांनी केला.

भाजयुमोचे अध्यक्ष ओ पी सिंह यांच्या मते, “ममता बॅनर्जींच्या राज्यात दर शुक्रवारी मुख्य रस्ते नमाजासाठी राखीव ठेवले जातात. रस्ते रोखल्याने लोकांना कामावर जाण्यास अडथळे निर्माण होतात. रुग्णांना रुग्णालयात नेता येत नाही. जर सरकारला नमाजामुळे अडचण नसेल, तर हनुमान चालिसालाही नको”

आम्ही आता दर मंगळवारी शहरातील मुख्य रस्त्यावर, हनुमान मंदिरासमोर हनुमान चालीसेचं पठण करु, असंही ओ पी सिंह यांनी सांगितलं.

दरम्यान, भाजयुमोच्या या पवित्र्यामुळे कोलकात्यातील मुख्य रस्त्यावर चांगलीच गर्दी झाली होती. अनेक ठिकाणी वाहतूकही रखडली.