Bhausaheb Wakchaure: चहा पिऊन बाहेर पडले अन्…. खासदार भाऊसाहेब वाकचौरे गेले कुठे? पत्नीने दिली मोठी अपडेट

Bhausaheb Wakchaure: खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या दिल्लीवारीनंतर उद्धव ठाकरे गटात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. ते पक्ष सोडून वेगळा गट स्थापन करणार असल्याच्या चर्चांना वेग आला असून, त्यांची पत्नी सरस्वती वाकचौरे यांनी दिल्लीला जाण्याचे कारण सांगितले असले तरी, पक्ष सोडण्याच्या चर्चांचे त्यांनी खंडन केलेले नाही. यामुळे ठाकरे गटाला संभाव्य मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Bhausaheb Wakchaure: चहा पिऊन बाहेर पडले अन्.... खासदार भाऊसाहेब वाकचौरे गेले कुठे? पत्नीने दिली मोठी अपडेट
Bhausaheb Wakchaures
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 17, 2026 | 1:20 PM

राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्ष पुन्हा फुटण्याच्या मार्गावर आहे. ठाकरेंचे सहाही खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडालेली आहे. हे खासदार फुटणार असल्याची चर्चा संपूर्ण मीडियात आहे. फुटणाऱ्या खासदारांची नावेही समोर आली आहेत. मात्र, यातील एकाही खासदाराने सुरू असलेल्या बातम्यांचं खंडन केलेलं नाही. यावरून खासदार फुटणार असल्याच्या चर्चांना बळ मिळत आहे. काही खासदार कालच दिल्लीला खास विमानाने गेल्याचं सांगितलं जातंय. त्याची माहिती समोर आली आहे. खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे सुद्धा कालच दिल्लीला गेल्याचं त्यांच्या पत्नीने सांगितलं. नेमकं काय घडलं याची माहिती त्यांनी दिली आहे.

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पत्नी सरस्वती वाकचौरे यांनी मीडियाशी संवाद साधला. चहा पिऊन गेले. बाहेर पडले. काल संध्याकाळच्या फ्लाईटने गेले. आज हरिद्वारला कार्यक्रम होता, त्यासाठी गेले, असं सरस्वती वाकचौरे यांनी सांगितलं.

काहीच बोलू शकत नाही

वाकचौरे साहेबांनी दोन दिवसात मोठी बातमी देतो असं सांगितलं होतं. तुम्हाला ते पक्ष सोडणार आहेत याची काही कल्पना आहे का? असा सवाल त्यांना पत्रकारांनी विचारला. पक्ष फुटीबाबत काही चर्चा झाली नाही. मला काही सांगता येणार नाही. त्यावर मी काही बोलणार नाही. काल पाच वाजता रेग्युलर विमानाने ते गेले. रात्री त्यांच्याशी संपर्क झाला होता. सकाळी मी त्यांना संपर्क नाही केला. फोन स्विच ऑफ असेल. रात्री उशिरा गेल्याने झोपले असतील. जागरण होतं. त्यांच्याशी संपर्क झाला तर सांगेल, असं त्या म्हणाल्या. मी राजकारणाबद्दल काही बोलू शकत नाही. माझा राजकारणाशी काहीच संबंध नाही. माझा काही अभ्यास नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

खंडन नाही

दरम्यान, ठाकरे गटाचे सहा खासदार फुटण्याच्या मार्गावर आहेत. या सहा खासदारांमध्ये भाऊसाहेब वाकचौरे यांचं नाव घेतलं जात आहे. भाऊसाहेब वाकचौरे यांनी यावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच त्यांनी ट्विटर किंवा इतर सोशल मीडिया माध्यमातून पक्ष सोडण्याच्या चर्चांचं खंडनही केलेलं नाही. त्यामुळे वाकचौरे ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. वाकचौरे हे दिल्लीतच असल्याचं सांगितलं जात आहे. काल त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचीही सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे चर्चांना अधिकच उधाण आलं आहे.

Follow Us