Bhavna Gawali : खासदार भावना गवळी एकनाथ शिंदेंच्या पाठीशी! बंडखोर आमदारांवर कठोर कारवाई करु नका, मुख्यमंत्र्यांना विनंती

| Updated on: Jun 22, 2022 | 6:37 PM

एकनाथ शिंदे यांनी बंडाचं निशाण फडकावल्यानंतर शिवसेनेत मोठा भूकंप झालाय.

Bhavna Gawali : खासदार भावना गवळी एकनाथ शिंदेंच्या पाठीशी! बंडखोर आमदारांवर कठोर कारवाई करु नका, मुख्यमंत्र्यांना विनंती
Bhavana Gawali
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांनी बंडाचं निशाण फडकावल्यानंतर शिवसेनेत मोठा भूकंप झालाय. शिवसेनेचे जवळपास 35 आमदार घेऊन एकनाथ शिंदे सध्या आसामच्या गुवाहाटीमध्ये आहे. मुख्यमंत्री संवाद साधण्यापूर्वी भावना गवळी यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती पत्र लिहिलंय….

भावना गवळी यांनी त्यांच्या पत्रात काय म्हटलंय, वाचा

मा. ना. उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख

महोदय,

सस्नेह जय महाराष्ट्र!

आपल्या सेवेशी नम्रपणे निवेदन करते की स्थितीत निर्माण झालेल्या परिस्थीतीमुळे आपण व्यतीय झाला आहात. पक्षापुढे अचानकपणे आले आपणासमोर खुप गोठे आव्हाण असल्याची कल्पना गला आहे. एक शिवसैनिक म्हणून मनातही याची खंत आहे.

आपल्या पक्षातील मावळे आमदार हिंदुत्वाय मुद्यावर आपणास निर्णय घेण्याकरीता विनंती करीत आहेत. हे सर्व शिवसेनेचे शिलेदार प्रथमतः हाडामासा शिवसैनिक आहेत. करीता त्यांच्या भावना समजून आपण त्यांच्यावर कुठलीही कार कार्यवाही न करता कठीन असला तरी शिवसेनेकरीता निर्णय घ्यावा हीच संदेशी पुनश्च नम्र दिनती करते

धन्यवाद।

आपली शिवसैनिक

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.