मोठी बातमी! मविआचा मोठा निर्णय, विधान परिषदेच्या सर्व जागा लढवणार? कोणाच्या वाट्याला किती जागा?

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे.

मोठी बातमी! मविआचा मोठा निर्णय, विधान परिषदेच्या सर्व जागा लढवणार? कोणाच्या वाट्याला किती जागा?
महाविकास आघाडी विधान परिषदेच्या सर्व जागा लढवण्याची शक्यता
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 27, 2026 | 5:27 PM

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे. विधान परिषदेच्या जागा वाटपावरून सध्या महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. कोणती जागा कोणाला मिळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे आता महाविकास आघाडीच्या गोटातून देखील मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे महाविकास आघाडी देखील विधान परिषदेच्या सर्व 17 जागा लढवणार आहे.

सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार या निवडणुकीत काँग्रेस सर्वाधिक जागा लढवण्याची शक्यता आहे, काँग्रेसनंतर सर्वाधिक जागा या शिवसेना ठाकरे गटाला मिळणार आहेत, त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा नंबर लागणार आहे. याबाबत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील माहिती दिली आहे. जागावाटपा संदर्भात आमची चर्चा झाली आहे, दोन दिवसांत पुन्हा बसून अंतिम जागा वाटप संपन्न होईल. आमच्यामध्ये जागा वाटपाचा कोणताही तिढा नसल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीकडून विधान परिषदेच्या सर्व 17 जागांवर उमेदवार उभे केले जाण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये काँग्रेसच्या वाट्याला सर्वाधिक सात आठ जागा येण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट पाच ते सहा जागा लढवण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गट तीन ते चार जागांवर आपले उमेदवार उभे करू शकतो, अशी माहिती समोर येत आहे.

महायुतीमध्ये रस्सीखेच 

दरम्यान दुसरीकडे महायुतीमध्ये अजूनही विधान परिषदेच्या जागांवरून रस्सीखेच सुरू असल्याचं पहायला मिळत आहे.  आता हा तिढा कधी सुटणार आणि कोणाच्या वाट्याला किती व कोणत्या जागा येणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी येत्या 18 जून रोजी मतदान होणार आहे, तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. या विधान परिषदेच्या जागांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारखी 1 जून आहे, 1 जून पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज दाखल करता येणार आहेत. तर दोन जून रोजी अर्जांची छाननी प्रक्रिया होणार आहे.

 

 

Follow Us