AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सहाव्या मजल्यावरून पडून दिग्दर्शकाचा मृत्यू, अचानक घडलेल्या घटनेने इंडस्ट्री हादरली

राष्ट्रीय पुरस्कार विजेते बंगाली दिग्दर्शक अनिक दत्ता यांचे 58 व्या वर्षी निधन झाले आहे. कोलकात्यात इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या आकस्मिक मृत्यूने चित्रपटसृष्टी हादरली आहे. ही घटना अपघात होती की यामागे काही घातपात आहे, याची पोलीस कसून चौकशी करत आहेत.

सहाव्या मजल्यावरून पडून दिग्दर्शकाचा मृत्यू, अचानक घडलेल्या घटनेने इंडस्ट्री हादरली
anik duttaImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 27, 2026 | 6:15 PM
Share

बंगाली सिनेमा जगतातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध दिग्दर्शक अनिक दत्ता यांचं वयाच्या अवघ्या 58 व्या वर्षी निधन झालं आहे. कोलकात्याच्या एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, अनिक दत्ता हे गरियाहाट येथे राहत होते. इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना जबर मार लागला. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्यांचा जीव वाचू शकला नाही. उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनिक दत्ता हे अत्यंत सर्जनशील दिग्दर्शक होते. त्यांच्या निधनाने इंडस्ट्रीत एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर लाल बाजार पोलीस मुख्यालयाचे होमिसाईड डिपार्टमेंट तात्काळ घटनास्थळी आलं आणि चौकशीची चक्रे वेगाने फिरली. या प्रकरणाचा अजून तपास सुरू आहे. अनिक दत्ता बंगाली सिनेमाचं मोठं नाव होतं. गेल्या 14 वर्षापासून ते बंगाली सिनेजगतावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अत्यंत कमी सिनेमे दिग्दर्शित केले. पण त्यांच्या सर्व सिनेमांचं प्रचंड कौतुक झालं. आज त्यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन होणं शक्य नाही. त्यामुळे उद्या 28 मे रोजी शवविच्छेदन झाल्यावरच त्यांच्या पार्थिवावर अंतिमसंस्कार करण्यात येणार आहे.

हॉरर कॉमेडी सिनेमाने सुरुवात

अनिक दत्ता यांनी 2012मध्ये Bhooter Bhabishyat या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली. हा एक हॉरर कॉमेडी सिनेमा होता. या सिनेमाला त्यावेळी चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यांनी केवळ या सिनेमाचं दिग्दर्शन केलं नव्हतं, तर सिनेमाची कथा आणि पटकथाही त्यांनीच लिहिली होती. त्यानंतर त्यांनी Astonishing Lamp, मेघनाद बध रहस्य, भोबिश्योतेर भूत, बोरुनबाबुर बंधु, Aparajito, Joto kando kolkatatei आदी सिनेमांचं दिग्दर्शन केलं.

राष्ट्रीय पुरस्कार

त्यांनी Astonishing Lamp या सिनेमाचं दिग्दर्शन केलंच. पण त्यांनी या सिनेमात गीतकार म्हणूनही कामगिरी पार पाडली. Aparajito सिनेमाचं दिग्दर्शन करतानाच गीतकार आणि प्लेबॅक सिंगर म्हणूनही त्यांनी बाजू सांभाळली होती. या सिनेमाला 2022मध्ये राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. या सिनेमाच्या दुसऱ्या पार्टवर ते सध्या काम करत होते. मात्र, त्यांनी अचानक एक्झिट घेतल्याने त्यांचं हे काम आता अधुरं राहिलं आहे. अनिक दत्ता यांच्या निधानाने फिल्म जगतावर शोककळा पसरली आहे. अनिक दत्ता यांचा मृत्यू तोल गेल्याने झाला की यामागे काही घातपात आहे का? याचीही चौकशी होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार.
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह...
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात...
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर..
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर...
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये..
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये...
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!.
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,.
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;.
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले....
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले.....
चक्क दिपाली सय्यद साकारणार रुपाली चाकणकर? नाशिकच्या अशोक खरात प्रकरण..
चक्क दिपाली सय्यद साकारणार रुपाली चाकणकर? नाशिकच्या अशोक खरात प्रकरण...