बिहारमध्ये तेजस्वी-राहुल गांधी यांची आघाडी फेल, एक्झिट पोलचा अंदाज  

| Updated on: Jul 05, 2019 | 3:35 PM

मुंबई : लोकसभा निवडणूक 2019 च्या सातही टप्प्यांचं मतदान पार पडलं. येत्या 23 मे ला निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर करणार आहे. निकाल जाहीर होण्यापूर्वी मतदानोत्तर चाचणीत त्याबाबतचा अंदाज बांधता येईल. टीव्ही 9 मराठी आणि सी व्होटरच्या सर्वात विश्वसनीय, सर्वात अचूक एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. एक्झिट पोलच्या आकड्यांनुसार, एनडीए बिहारमध्ये सर्वात जास्त […]

बिहारमध्ये तेजस्वी-राहुल गांधी यांची आघाडी फेल, एक्झिट पोलचा अंदाज  
Follow us on

मुंबई : लोकसभा निवडणूक 2019 च्या सातही टप्प्यांचं मतदान पार पडलं. येत्या 23 मे ला निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर करणार आहे. निकाल जाहीर होण्यापूर्वी मतदानोत्तर चाचणीत त्याबाबतचा अंदाज बांधता येईल. टीव्ही 9 मराठी आणि सी व्होटरच्या सर्वात विश्वसनीय, सर्वात अचूक एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत.

एक्झिट पोलच्या आकड्यांनुसार, एनडीए बिहारमध्ये सर्वात जास्त जागा मिळतील. एनडीएला 40 पैकी 33 जागा मिळू शकतात. मतांच्या टक्केवारी बघितली तर एनडीएला 48.70 टक्के मतं मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बिहारमध्ये यूपीएला 40 पैकी केवळ 7 जागा मिळत आहेत. यूपीएला 38.90 टक्के मतं मिळत आहेत.

पक्ष जागा मतांची टक्केवारी
एनडीए 33 48.70%
यूपीए 7 38.90%
इतर 0 12.40%

 

गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदी लाट होती. तेव्हाही भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीएला) 40 पैका 31 जागा मिळाल्या होत्या. यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये एक मोठा बदल बघायला मिळाला. यावेळी नितीश कुमार यांच्या जनता दलाने पुन्हा एनडीएमध्ये वापसी केली. त्यामुळे याचा फायदा भाजपला होऊ शकतो.

लोकसभा निवडणूक 2014 मध्ये एकट्या भाजपने 22 जागा मिळवल्या होत्या, तर लोक जनशक्ती पक्षाला (लोजप) 7 आणि राष्ट्रीय लोक समता पक्षाला (रालोसप) 4 जागा मिळाल्या होत्या. यंदा नितीश कुमारसोबत युती झाल्याने भाजप केवळ 17 जागांवरच निवडणूक लढला. यावेळी जेडीयूही 17 जागांवर लढली. लोजपा 6 जागांवर लढली.

राष्ट्रीय जनता दल पक्षाचे तेजस्वी यादव महाआघाडीत सामील झाले. मात्र, राहुल गांधी आणि तेजस्वी यादव हे एकत्र येऊनही ते एनडीएला मोठे आव्हान देऊ शकलेले नाहीत, असाच अंदाज एक्झिट पोलने वर्तवला.