सरकार स्थापनेत कुणाला मदत करणार? बीजू जनता दलाकडून स्पष्ट संकेत

| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

भुवनेश्वर : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे भाकीत करणाऱ्या एग्झिट पोलनंतर प्रादेशिक पक्षांनी 23 मेनंतरची रणनीती ठरवायला सुरुवात केली आहे. ओडिशातील प्रमुख पक्ष बीजू जनता दलाने (BJD) देखील निकालानंतर कुणाला पाठिंबा देणार याबद्दल स्पष्ट संकेत दिले आहेत. लोकसभा निकाल एक्झिट पोलच्या अंदाजानुसारच राहिला आणि NDA केंद्रात सरकार स्थापन करणार असेल, तर आपण सरकारमध्ये सहभागी होऊ, असेच संकेत बीजेडीने […]

सरकार स्थापनेत कुणाला मदत करणार? बीजू जनता दलाकडून स्पष्ट संकेत
Follow us on

भुवनेश्वर : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे भाकीत करणाऱ्या एग्झिट पोलनंतर प्रादेशिक पक्षांनी 23 मेनंतरची रणनीती ठरवायला सुरुवात केली आहे. ओडिशातील प्रमुख पक्ष बीजू जनता दलाने (BJD) देखील निकालानंतर कुणाला पाठिंबा देणार याबद्दल स्पष्ट संकेत दिले आहेत.

लोकसभा निकाल एक्झिट पोलच्या अंदाजानुसारच राहिला आणि NDA केंद्रात सरकार स्थापन करणार असेल, तर आपण सरकारमध्ये सहभागी होऊ, असेच संकेत बीजेडीने दिले आहेत. बीजेडीचे वरिष्ठ प्रवक्ते अमर पटनायक यांनी सरकार स्थापनेतील आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “जे सरकार आमच्या वैध मागण्या पूर्ण करतील त्यांना आम्ही पाठिंबा देऊ. जर NDA सरकार बनवत असेल तर आम्ही त्यांना देखील पाठिंबा देऊ. आमच्या ‘स्पेशल कॅटिगरी’सारख्या समस्या जो पक्ष समजून घेईल, आम्ही त्याच्यासोबत राहू.” यावेळी त्यांनी केंद्रात सरकार बनवण्याच्या स्थितीत जो पक्ष असेल त्याला पाठिंबा देण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ओडिशा दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री नवीन पटनायकांची भेट देखील लक्ष्यवेधी ठरली होती. त्यानंतर मोदींनी पटनायक यांच्यावरील टीकाही कमी केली आहे. मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर टीका करताना ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या वादळातील बचाव कामाची प्रशंसा केली होती.

आज अखिलेश यादवही मित्रपक्ष बसपाच्या प्रमुख मायावतींना भेटण्यासाठी गेले. दोन्ही नेत्यांमध्ये जवळजवळ 1 तास चर्चा झाली. चंद्रबाबू नायडूंनीही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींंची भेट घेतली. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार देखील विरोधीपक्षांना एकत्र आणण्यासाठी सक्रीय झाले आहेत. काँग्रेसही निकालानंतरच्या शक्यतांची चाचपणी करण्यात व्यस्त आहे.