नगरमधील पराभवाला विखे जबाबदार, भाजपच्या पराभूत उमेदवारांचा आरोप

भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपात एकटे पडल्याचं चित्र दिसत आहे. त्यांच्या विरोधात नगर जिल्ह्यातील सर्व माजी आमदार एकवटले आहेत.

नगरमधील पराभवाला विखे जबाबदार, भाजपच्या पराभूत उमेदवारांचा आरोप

अहमदनगर : भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपात एकटे पडल्याचं चित्र दिसत आहे. त्यांच्या विरोधात नगर जिल्ह्यातील सर्व माजी आमदार एकवटले आहेत. काल (14 डिसेंबर) नाशिक येथे झालेल्या भाजपच्या बैठकीत माजी आमदारांनी विखेंच्या विरुद्ध पाढाच वाचला आहे. त्यामुळे विखे (BJP leaders against vikhe patil) भाजपात एकटे पडल्याचे दिसत आहे.

अहमदनगरमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपचा सुपडा साप झाला. जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार तर राम शिंदे (BJP leaders against vikhe patil) पालकमंत्री होते. मात्र या पाच आमदारांपैकी फक्त मोनिका राजळे निवडून आल्या बाकी आमदारांना मात्र पराभव स्वीकारावा लागला. याचे खापर विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षात आलेले माजी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर फोडले जात आहे.

नाशिक येथे झालेल्या भाजपच्या बैठकीत आशिष शेलार यांच्या समोर देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू माजी मंत्री आणि भाजपाचे नेते राम शिंदे यांच्यासह माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि शिवाजी कर्डीले यांनी विखे पाटलांवर थेट आरोप केला. विखे पाटील पिता-पुत्रांनी तर विधानसभा निवडणुकीत 12-0 असा नारा दिला होता. त्यावर कर्डीले यांनी 12-0 चं काय झालं हे त्यांना विचारा असा सवालच उपस्थित केला.

अहमदनगर जिल्ह्यात भाजपाचे अगोदर 5 आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आलेले 2 असे मिळून 7 आमदार होते. त्यात वाढ होण्याऐवजी ती संख्या 3 वर आली. जिल्ह्यातील भाजपा उमेदवारांच्या पराभवास कॉंग्रेसमधून आलेले राधाकृष्ण विखे पाटील हेच जबाबदार आहेत. ते जेथे जातात तेथे खोड्या करतात, त्यातून त्या पक्षासाठी हानिकारक वातावरण तयार करतात असा हल्लाबोल पराभूत उमेदवार माजी मंत्री राम शिंदे यांच्यासह माजी आमदार स्नेहलता कोल्हे व शिवाजी कर्डीले यांनी केला.

विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवाची कारणमीमांसा करण्याच्या निमित्ताने उत्तर महाराष्ट्राची आढावा बैठक नाशिकमध्ये पार पडली. आमदार आशिष शेलार यांनी नाशिक येथे बैठक घेऊन नगर जिल्ह्यातील पराभूत उमेवारांशी चर्चा केली आणि पराभवाची कारणं जाणून घेतली. मात्र यात फक्त विखे हेच हिटलिस्टवर होते. त्यामुळे जिल्ह्यात विखे पिता-पुत्र भाजपात एका एकी पडल्याचं चित्र आहे. पुढच्या काळात भाजप विखे पाटलांविरुद्ध काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

दरम्यान, भाजप नेते एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांच्यानंतर आता राम शिंदे यांनीही पक्षातंर्गत होत असलेली खदखद जाहीरपणे व्यक्त केली आहे. यामुळे भाजपच्या अडचणीत वाढ झाल्याचे बोललं जात आहे. “पक्षात आलेल्या बड्या नेत्यांमुळे माझ्यासारख्यांचा पराभव झाला, असं राम शिंदेंनी काल सांगितले होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *