“राजकारणात काहीही सहन करा, पण धोका सहन करू नका, गद्दारांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे”, अमित शाह यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

| Updated on: Sep 05, 2022 | 3:33 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला मुंबई महापालिका निवडणुकीसाठी कानमंत्रही दिला.

राजकारणात काहीही सहन करा, पण धोका सहन करू नका, गद्दारांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे, अमित शाह यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
Follow us on

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला मुंबई महापालिका निवडणुकीसाठी कानमंत्रही दिला. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी धोका दिल्याचं म्हटलं. या धोक्याचा कसुर भरून काढायचाय असंही ते म्हणालेत. आपल्या सगळ्यांना माहितेय की उद्धव ठाकरे यांनी आपल्याला धोका दिलाय. राजकारणात काहीही सहन करा, धोका सहन करू नका, धोका देणाऱ्या गद्दारांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे, असं अमित शाह यावेळी म्हणाले.

महापालिका निवडणूक तोंडावर आहे. अश्यात केंद्रीय अमित शाह यांचा हा दौरा महत्वपूर्ण आहे. मुंबई महापलिकेची निवडणूक डोळ्या समोर ठेवून पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी भाजप सोडत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. 2019 ची भर आता भरून काढायची आहे, असं यावेळी अमित शाह म्हणाले.

मुंबई महापालिका निवडणुकातील भाजप आणि एकनाथ शिंदे यांचा गट एकत्र लढणार असल्याची घोषणा अमित शाहा यांनी केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी मुंबई महापालिकेचं भाजपचं टार्गेट काय असेल तेही स्पष्ट केलं आहे. मुंबई महापालिकेत 150 नगरसेवक निवडून आणण्याचं टार्गेट असेल असं अमित शाह म्हणाले. अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेघदूत बंगल्यावर भाजपाच्या आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांना मार्गदर्शन केलं. अमित शाह यांनी मुंबई दौऱ्यावेळी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.

हे सुद्धा वाचा

2019 ला विधानसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्रीपदावरून शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेतला. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जात सरकार स्थापन केलं. त्यानंतर अडीच वर्षे महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत होतं. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. अन् पुन्हा एकदा भाजपसोबत जात त्यांनी सरकार स्थापन केलं. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. अश्यात अमित शाह यांचा दौरा महत्वपूर्ण आहे. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी रणशिंग फुंकलंय.