Video : फडणवीसांच्या गाडीसमोर गर्दी बाजूला करण्यासाठी दानवेंचा पुढाकार! औरंगाबादेत नेमकं काय घडलं? पाहा व्हिडीओ

| Updated on: May 24, 2022 | 7:14 AM

संभाजीनगरवासियांचा पाण्यासाठीचा आक्रोश आज रस्त्यावर अवतरला. शहरातील माझ्या भगिनी आणि बंधूंनी या मोर्चाला दणदणीत प्रतिसाद देत महाविकास आघाडीला निर्वाणीचा इशारा दिला.

Video : फडणवीसांच्या गाडीसमोर गर्दी बाजूला करण्यासाठी दानवेंचा पुढाकार! औरंगाबादेत नेमकं काय घडलं? पाहा व्हिडीओ
फडणवीसांच्या गाडीसमोर गर्दी बाजूला करण्यासाठी दानवेंचा पुढाकार!
Image Credit source: facebook
Follow us on

औरंगाबाद – औरंगाबादमधील (Aurangabad) पाणी प्रश्नावर भाजपचे अनेक नेते आक्रमक झाले आहेत. काल देवेंद्र फडणवीस (Devedra Fadanvis) यांची गाडी मोर्चातून जात होती. त्यावेळी त्यांच्या गाडीला जायला रस्ता नव्हता. त्याचवेळी भाजपचे नेते रावसाहेब दानवेंनी (Raosaheb Danve) भाजपचा झेंडा हातात घेऊन कार्यकर्त्यांना बाजूला केले.त्यामुळे फडणवीसांची गाडी तिथून जाऊ शकली. गाडी पुढे सरकरण्यास अडचण होत असल्याचे दानवे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी घटनास्थळी उपस्थित कार्यकर्त्यांना बाजूला केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायल झाला आहे. औरंगाबादमधील पाण्याची समस्या निर्माण झाल्यापासून शिवसेनेवरती भाजपकडून जोरदार टीका केली जात आहे. काल भाजपकडून पालिकेच्या कारभाराविरोधात जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड यांच्यासह भाजपचे मोठे नेते आंदोलनात सहभागी झाले होते. इतकी वर्षे शिवसेनेची सत्ता असून देखील त्यांना पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही अशी टीका देखील फडणवीसांनी केली.

भाजपा पूर्ण ताकदीने हा संघर्ष करेल

संभाजीनगरवासियांचा पाण्यासाठीचा आक्रोश आज रस्त्यावर अवतरला. शहरातील माझ्या भगिनी आणि बंधूंनी या मोर्चाला दणदणीत प्रतिसाद देत महाविकास आघाडीला निर्वाणीचा इशारा दिला. हा पाण्याचा प्रश्न सुटत नाही,तोवर भाजपा पूर्ण ताकदीने हा संघर्ष करेल.
पाण्याचा फटका तसा तर सर्वांनाच बसतो. पण, सर्वाधिक त्रास होतो, आमच्या भगिनींना. या जलआक्रोशमोर्चाला आज महिलांची उपस्थिती ही अतिशय लक्षणीय होती. प्रत्येक भगिनीचा आक्रोश प्रशासनाची दैना सांगणारा होता असा टोला देवेंद्र फडणवीसांनी पालिकेला लगावला.

महाविकास आघाडी सरकारला कोणतीच समस्या सोडवायची नाही

संभाजीनगरसाठी 1680 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना आम्ही मंजूर केली. पण, ‘टक्के’वारी आणि ‘वाटा’घाटीत या योजनेची अतिशय संथ अंमलबजावणी होते आहे. संभाजीनगर तहानलेले आहे आणि महाविकास आघाडी सरकारला कोणतीच समस्या सोडवायची नाही अशी टीका महाविकास आघाडी सरकारवरती देवेंद्र फडणवीसांनी केली.

या जलआक्रोशमोर्चामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडेजी, माजी मंत्री अतुल सावेजी, गिरीश महाजन, विजयाताई रहाटकर, प्रशांत बंब, नारायण कुचे, संजय केणेकर इत्यादी भाजपचे नेते सभेला उपस्थित होते.