Video | ‘डर्टी डझन रांगेत’ देशमुख मलिकांनंतर कुणाचा नंबर? सोमय्या म्हणतात चिट्ठी टाकावी लागेल

| Updated on: Feb 24, 2022 | 2:33 PM

Kirit Somaiya : केंद्राकडून तपास यंत्रणाचा गैरवापर सुरु असल्याचा आरोप एकीकडे महाविकास आघाडीमधील नेते करत आहेत, तर दुसरीडे भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दोघे गेले अजून दहा जण रांगेत आहेत, असं म्हटलंय.

Video | डर्टी डझन रांगेत देशमुख मलिकांनंतर कुणाचा नंबर? सोमय्या म्हणतात चिट्ठी टाकावी लागेल
डर्डी डझन महाराष्ट्राला लुटत आहेत, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय.
Follow us on

मुंबई : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीनं अटक (Nawab Malik ED arrest) केल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक असा संघर्ष पेटलाय. केंद्राकडून तपास यंत्रणाचा गैरवापर सुरु असल्याचा आरोप एकीकडे महाविकास आघाडीमधील नेते करत आहेत, तर दुसरीडे भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दोघे गेले अजून दहा जण रांगेत आहेत, असं म्हटलंय. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी डर्टी डझन (Dirty Dozen) रांगेत आहेत, असं विधान केलं आहे. दरम्यान, एका पत्रकाराशी बोलत असताना त्यांनी हे विधान केल्याचं म्हटलंय. अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर आणखी बारा जण आहेत, जे जेलमध्ये जातील, असं किरीट सोमय्यांनी म्हटलंय. यावेळी किरीट सोमय्या यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवरही निशाणा साधलाय. संपूर्ण राज्यभरात नवाब मलिकांचा राजीनाम्या घ्या पूर्ण भाजपकडून आंदोलन करण्यात येतंय. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजप सूडाचं राजकारण करत असल्याचा आरोप करत निषेध आंदोलन करण्यात आलंय.

‘ते’ डर्टी डझन कोण?

नवाब मलिकांच्या समर्थनात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यभर निदर्शनं केलीत. याबाबत पत्रकारांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया घेतली असता, ते म्हणाले की,…

एकूण बारा जण लाईनमध्ये आहेत. मला सकाळी एका पत्रकारानं विचारलं, आता कुणाची बारी आहे? त्याला मी म्हणालो, आता चिट्ठी काढावी लागेल. आतापर्यंत दोन गेले. दहांवरची चौकशी आणि तपास सुरु आहे. माझी वक्तव्य भविष्यवाणी नाहीये. उद्धव ठाकरेंचा घोटाळाही सिद्ध झालाय. पण मुख्यमंत्री गप्प बसले. हिंमत असेल तर उत्तर द्या, मुख्यमंत्रीसाहेब! तुमच्या बायकोचं 2019चं पत्र खरं की 2021चं पत्र खरं, हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं. त्यामुळे आंदोलन करु नका.

संजय राऊत ऑफिसरच्या नावानं धमक्या देतात. किरीट सोमय्याला जेलमध्ये टाकणार, असं धमकावतात. माझ्या बायको मुलांना जेलमध्ये टाकणार, असं राऊथ म्हणतात. हे पवार आणि ठाकरेंना शोभतं का? अरे आमचा सगळा परिवार जेलमध्ये जायला तयार आहे. पण या महाराष्ट्राला लुटणाऱ्या डर्डी डझनचा हिशोब होणारच!

ठाकरे-पवारांवर निशाणा

दरम्यान, यानंतर किरीट सोमय्यांना नवाब मलिक यांच्यावर करण्यात आलेल्या वेश्या व्यवसायाच्या आरोपांवरही प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी मलिकांनी यावर बोलणं टाळलं. मलिकांच्या चौकशीवर बोलणार नाही. चौकशीअंती काय ते बोलता येईल, असं ते म्हणालेत. एएनआयही तपास करत आहे. यावेळी किरीट सोमय्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. ते म्हणाले की…

बाळासाहेबांनी भाषणं केलीत. आपल्या भाषणात बाळासाहेब म्हणाले की, दाऊद आणि शरद पवारांची जोडी महाराष्ट्राची वाट लावणार म्हणून.. आता सगळ्या प्रकाराची चौकशी सुरु आहे. आता दाऊदच्या जोडीतला एक माणूस उद्धव ठाकरेंचा जोडीदार आहे.

पाहा व्हिडीओ –

संबंधित बातम्या :

‘लाज वाटते, आमच्यातील लोकांनी शेतकऱ्यांना नक्षलवादी म्हटलं!’ आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघात

Video | सकाळी-सकाळी ED अधिकारी मलिकांच्या घरी पोहचले, तेव्हा नेमकं काय घडलं ? ऐका…

Video : भाजपच्या बुद्धीबद्दलच मला शंका आहे, राजकारण हिमालयावरून खाली येतंय, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप!