
नाशिकच्या तपोवनमध्ये साधूग्रामसाठी झाडं तोडण्याचा मुद्दा तापला आहे. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्यासाठी तपोवनमधील झाडं तोडण्यात येतील. मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे कुंभमेळ्याच्या विकास कामांची जबाबदारी आहे. गिरीश महाजन या मुद्यावर म्हणाले की, “ही जागा साधूग्रामसाठी रिझर्व आहे. ही जागा कोणाच्या घशात घालण्याच्या प्रश्नच येत नाही. उलट राईचा पर्वत करायचं काम कोणीही करू नये” राज ठाकरे यांच्या प्रश्नाला गिरीश महाजनांचे प्रत्युत्तर. “वृक्षप्रेमी तपोवनात आलेत. त्यांनी राग व्यक्त केला. मात्र कुंभमेळा बारा वर्षात एकदा येतो. वृक्ष तोडणीच्या बाबतीत सरकारची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही वृक्षप्रेमी आहोत” असं गिरीश महाजन म्हणाले.
“काही झाड काढणार आहोत. एका झाडाला दहा झाड लावणार. हजार झाड काढणार असून त्याच्या बदलत 15000 झाडं लावणार. झाडे लावण्याचे काम सुरू झाले असून हैदराबादवरून झाडं आणणार आहोत. आम्ही लावणार असलेल्या झाडांमुळे जंगल वाढणार आहे” असं मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. “सरसकट झाड तोडत नाही आहोत. झाडं तोडून त्या ठिकाणी रेस्टॉरंट बांधणार नाही” असं मंत्री गिरीश महाजन म्हणाले.
सयाजी शिंदेंना काय उत्तर दिलं?
“गिरीश महाजन उत्तर द्या. गिरीश महाजन तुम्ही जबाबदार माणूस आहात. तुमची-माझी काही दुश्मनी नाही आणि झालीच तरी काही फरक पडत नाही” असं सयाजी शिंदे म्हणाले. त्यावर गिरीश महाजन म्हणाले की, “सयाजी शिंदे यांच्या समाधान झाल्यानंतर आम्ही झाडं लावू. आम्ही असं म्हणत नाही आहोत, की आम्ही लावून टाकू, करून टाकू, आम्ही आधी लावू मग तुम्ही आम्हाला सांगा,काय करायचं?” असं गिरीश महाजन म्हणाले.
नारायण राणे यांना संपवण्याच्या आरोपावर काय म्हणाले?
“नारायण राणे साहेब आमच्यासाठी आदरणीय आहेत. त्यांनी केंद्रात देखील काम केलेलं आहे. राणेसाहेब भाजप बद्दलच बोलतात. कुठेही त्यांना संपवण्याचे काम होत नाही आहे. राणे साहेबांची मुलं मोठी झाली आहेत. मात्र राणेसाहेब पक्षाच्या प्रत्येक बैठकीला उपस्थित असतात. एखाद्या ठिकाणी आले नसतील तर ते नाराज आहेत. त्यांना संपवण्याचे काम सुरू आहे असं समजण्याचं काम अजिबात नाही” असं गिरीश महाजन म्हणाले.