शेतकरी आंदोलनावरुन प्रवीण दरेकर-शरद पवार आमनेसामने, पवारांच्या टीकेला प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर…

| Updated on: Jan 27, 2021 | 6:47 AM

पवारांच्या टीकेला आता पुन्हा एकदा प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. | Pravin Darekar Reply Sharad Pawar

शेतकरी आंदोलनावरुन प्रवीण दरेकर-शरद पवार आमनेसामने, पवारांच्या टीकेला प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर...
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
Follow us on

मुंबई : दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनावरुन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आमने-सामने आले आहेत. दिल्लीत जे आंदोलन पेटलंय ते शेतकरी नाहीतच, असा दावा करणाऱ्या दरेकरांच्या वक्तव्याचा शरद पवार यांनी जोरदार समाचार घेतला. प्रवीण दरेकर यांनी केलेले वक्तव्य ऐकून आता मला लाज वाटायला लागली आहे, असं पवार म्हणाले. पवारांच्या टीकेला आता पुन्हा एकदा प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (BJP Leader Pravin Darekar Reply NCP  Sharad Pawar)

“माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याची पवार साहेबांनी दखल घेणं, हे माझं स्वतःचं भाग्य समजतो. वर्षभर महाराष्ट्र अडचणीत असताना राज्य सरकार राजकारण करत होतं, परंतु त्याकाळात विरोधी पक्षनेता म्हणून विधायक दृष्टीने मी काम केलं”, असं दरेकर म्हणाले.

पुढे बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, “वस्तूस्थिती मांडणं हा काय दोष आहे का? शेतकरी मोर्चात भेंडी बाजारमधील भगिनी कशा? हे केवळ एक उदाहरण म्हणून मी सांगितलं. मी आधार असलेलं वक्तव्य केलेलं आहे, कोणाच्या सांगण्यावरून बोललो नाही”

प्रवीण दरेकर शेतकरी आंदोलनावर काय म्हणाले…?

दिल्लीत जे आंदोलन पेटलंय ते शेतकरी करूच शकत नाही. शेतकरी असं आंदोलन पेटवूच शकत नाहीत. लोकांच्या पोटाची भूक भगावणारा शेतकरी आंदोलन पेटवण्याची भाषा करूच शकत नाही. आंदोलन पेटवूच शकत नाही. काही देशविघातक शक्ती या आंदोलनामागच्या बोलवित्या धनी आहेत, असा दावाही त्यांनी केला.

शरद पवारांची दरेकरांवर टीका

शेतकरी आंदोलनावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेले वक्तव्य ऐकून आता मला लाज वाटायला लागली आहे. कारण, एकेकाळी मीदेखील विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता होतो, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली.

आझाद मैदानावरील मोर्चासाठी शेतकरी एवढ्या लांबवरुन चालत आले होते. त्यांचे पाय सुजले होते, फोड आले होते. पण ते एका तडफेने आझाद मैदानावर पोहोचले होते. अशावेळी विरोधी पक्षनेत्याने खरंतर या शेतकऱ्यांची भेट घ्यायला हवी होती. मात्र, विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्याने अशाप्रकारचे वक्तव्य करणे, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. एकेकाळी मी विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता होतो, याची मला आता लाज वाटत असल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते. (BJP Leader Pravin Darekar Reply NCP  Sharad Pawar)

हे ही वाचा :

शेतकऱ्यांविषयी ‘तो’ प्रश्न उपस्थित करणाऱ्या प्रवीण दरेकरांना शरद पवारांचा सणसणीत टोला, म्हणाले…

आंदोलन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका; त्यांची संपत्ती जप्त करा: कंगना रनौत

भेंडी बाजारात कुठून आले शेतकरी?, आंदोलनात लोकं घुसवली; प्रवीण दरेकरांची टीका