पुण्याच्या भोर येथे कर्जतप्रमाणे दुसरा वीज प्रकल्प, येथेही झाडांची होणार कत्तल?, भाजपा नेत्यानेच केला विरोध

हा वीज प्रकल्प रद्द व्हावा या मागणीसाठी आज हे मानवी साखळी आंदोलन करण्यात येत आहे.यामध्ये महिला आणि लहान मुले तसेच हजारो पुरुष हजारोंच्या संख्येने सहभागी झाले आहेत..

पुण्याच्या भोर येथे कर्जतप्रमाणे दुसरा वीज प्रकल्प, येथेही झाडांची  होणार कत्तल?, भाजपा नेत्यानेच केला विरोध
BJP leader Sangram Thopte
| Updated on: Nov 22, 2026 | 4:16 PM

पुण्याच्या भोर तालुक्यातील भोंगवली गावात होऊ घातलेला पुणे ट्रान्समिशन 3 या खाजगी कंपनीचा हाय-व्होल्टेज सबस्टेशन आणि टॉवर लाईनचा प्रकल्प रद्द व्हावा यामागणीसाठी भोंगवली ग्रामस्थांचे मानवी साखळीचे आंदोलन केले आहे. या गावापासून प्रकल्पापर्यंत ग्रामस्थांनी मोर्चा काढत प्रकल्पाभोवती मानवी साखळी करून आंदोलन केले आहे. या प्रस्तावित हाय व्होल्टेज सबस्टेशन प्रकल्पाविरोधात, व्यापक लढा उभारण्याचा निर्धार करत, भाजप नेते माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या अध्यक्षतेखाली ‘सबस्टेशन आणि टॉवर लाईन हटाव संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे.

‘सबस्टेशन आणि टॉवर लाईन हटाव संघर्ष समितीने प्रकल्प रद्द व्हावा या मागणीसाठी याआधीही पुणे- सातारा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले होते.त्यानंतर प्रकल्पाचे काम 2 महिने बंद ठेवण्यात आले होते.,मात्र पुन्हा हे काम चालू करण्याच्या हालचाल सुरू झाल्याने पुन्हा ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

Loading...

ग्रामस्थांचे म्हणणे कायं….

या प्रकल्पाच्या हायटेन्शन टॉवर लाईनमुळे सुपीक जमिनी बाधित होणार असून ग्रामीण भागातील विकासावरही त्याचा विपरीत परिणाम होणार असल्याचे मत या बाधित गावातील शेतकऱ्यांची आहे.त्यामुळे या गावांतील हजारो शेतकरी भूमीहीन आणि अल्पभूधारक होण्याची शक्यता असल्यानं, या गावातील शेतकऱ्यांना या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे.

ग्रामस्थांनी उपस्थित केलेले सवाल…

१. शेतीच्या नावाखाली औद्योगिक कारणांसाठी जमीन खरेदी?

शेतकऱ्यांच्या जमिनी शेतीच्या कारणासाठी असल्याचे सांगून किंवा त्या स्वरूपात व्यवहार करून प्रत्यक्षात औद्योगिक प्रकल्पाच्या दृष्टिकोनातून जमिनी खरेदी आणि हस्तांतरित करण्यात आल्याचा आरोप आहे. या व्यवहारांमध्ये जमीन हस्तांतरणाचे नियम, वापरातील बदल आणि आवश्यक शासकीय परवानग्यांचे पालन झाले आहे का, याची चौकशी होणे आवश्यक आहे.

२. परवानगीशिवाय मोठ्या प्रमाणावर उत्खनन

प्रकल्पाच्या परिसरात कोणतीही आवश्यक शासकीय परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर माती व मुरूम उत्खनन करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शासकीय नियमांना बगल देऊन मोठ्या प्रमाणात उत्खनन झाले असल्यास संबंधित जबाबदार व्यक्ती व कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

३. अवैध सुरुंगस्फोटामुळे विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्याचा प्रश्न

परिसरात अनधिकृतपणे सुरुंग लावून स्फोट घडविण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. या स्फोटांमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरी व बोअरवेलमधील पाण्याचे स्रोत बाधित झाले असून काही ठिकाणी पाणी कमी झाल्याचे किंवा बंद पडल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याची भूजल विभाग व संबंधित तज्ज्ञांमार्फत स्वतंत्र तपासणी करण्यात यावी.

४. महावितरणच्या विजेची चोरी केल्याचा आरोप

प्रकल्पाच्या ठिकाणी महावितरणच्या विद्युत तारांवर आकडा टाकून अनधिकृतपणे वीज वापरण्यात आल्याचा आरोप आहे. हा प्रकार सत्य असल्यास संबंधितांवर वीज कायद्यानुसार कठोर कारवाई करून झालेल्या नुकसानीची वसुली करावी.

५. असंख्य झाडांची कत्तल; पर्यावरणाचे नुकसान

प्रकल्पाच्या कामादरम्यान परिसरातील असंख्य झाडे तोडण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. वृक्षतोडीसाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या का? किती झाडे तोडण्यात आली? त्याबदल्यात वृक्षलागवड करण्यात आली का? या सर्व बाबींची चौकशी होणे गरजेचे आहे.

संग्राम थोपटे यांचे म्हणणे आहे ?

या प्रोजेक्टला या भोंगवली गावाचा पहिल्यापासूनच विरोध आहे.अनेकवेळा विविध आंदोलन करत याचा विरोध आम्ही दर्शवलेला आहे.त्यानंतर वरिष्ठांसोबत मीटिंग सुद्धा झालेली आहे. मीटिंगमध्ये आम्ही संघर्ष समितीच्या वतीने पर्यायी जागेचा दिलेले होते. भोरच्या प्रांतांनी ह्या प्रकल्पाच्या जागेसाठी खाजगी जागेतून रस्ता द्यावा असा आदेश काढला आहे. भीमाशंकरच्या जंगलाप्रमाणे या प्रकल्पासाठी सुद्धा हजारो झाडांची कत्तल झालेली आहे. वन विभागाकडे तक्रार करूनही त्यांनी कानाडोळा केलेला आहे असा आरोप सबस्टेशन हटाव कृती समितीचे संग्राम थोपटे यांनी केला आहे.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us